Sambhajinagar News : पादचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत प्रशासन असंवेदनशील

५ वर्षांत ८७२ प्राणांतिक अपघात; आणखी किती बळी गेल्यानंतर येणार जाग ?
Sambhajinagar News
Sambhajinagar News : पादचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत प्रशासन असंवेदनशीलfile photo
Published on
Updated on

Administration Insensitive to Pedestrian Safety

प्रमोद अडसुळे

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात पादचाऱ्यांना सुरक्षित चालण्यासाठी ना फुटपाथ उरलेत, ना रस्ता ओलांडण्यासाठी सिझलला वेळ दिला जातोय, त्यातच आता भरधाव वेगाने आणि बेदरकारपणे धावणारी वाहने पादचाऱ्यांसाठी साक्षात यमदूत ठरत आहेत. प्रशासनाचे नियोजनशून्य धोरण आणि वाहतूक नियमांची पायमल्ली यामुळे शहराचे मुख्य रस्ते आता पादचाऱ्यांसाठी मृत्यूचे सापळे बनले आहेत. गतवर्षभरात शहरात १५० तर पाच वर्षात ८७२ प्राणांतिक अपघातात घडले. त्यामुळे आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन रस्ता सुरक्षेकडे लक्ष देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Sambhajinagar News
Naigaon Encroachment | नायगावमध्ये प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; अतिक्रमणावर सलग चौथ्या दिवशी बुलडोझर

सतत वाहनांच्या धडकेची भीती

कोणताही चौक किंवा रस्ता ओलांडून जाताना पादचाऱ्यांना आता सतत वाहनाच्या धडकेची भीती सतावत असते. शहरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा वेग पूर्णपणे अनियंत्रित असतो. रस्त्यांवर प्रशासनाचा किंवा वाहतूक पोलिसांचा कोणताही धाक उरलेला नसल्याने, बेदरकारपणे वाहने चालवणाऱ्या चालकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. याच अतिवेगामुळे पादचा-यांना धडक बसून अपघात होण्याच्या पटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे.

मृत्यूला आमंत्रण देण्यासारखी स्थिती

तरुणांना कसातरी रस्ता ओलांडता येतो, पण शाळकरी मुले, महिला, दिव्यांग आणि वयोवृ‌द्धांसाठी शहरातील मुख्य रस्त्यावरून चालणे किंवा रस्ता ओलांडणे म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देण्यासारखेच झाले आहे. वाहनांच्या गर्दीतून वाट काढताना अनेकदा ज्येष्ठ नागरिकांची उडणारी तारांबळ प्रशासनाच्या असंवेदनशीलतेची साक्ष देते.

Sambhajinagar News
Waluj Mahanagar : अवैध धंद्यांविरोधात गावबंद आंदोलन

प्रशासनाचा नाकर्तेपणा, लोकांच्या जीवाशी खेळ

स्मार्ट सिटीचा डंका पिटणाऱ्या मनपाला सामान्य पादचाऱ्यांचा पूर्णपणे विसर पडला आहे. ५२ पैकी केवळ ३४ सिझल सुरू आहेत. त्यात सिग्रलमध्ये पादचाऱ्यांसाठी शून्य सेकंदाची तरतूद, अतिक्रमणांनी गिळंकृत केलेले फुटपाथ आणि भुयारी मार्गाचा पूर्ण अभाव, हे सर्व प्रशासनाच्या नाकर्तेपणाचे उदाहरण आहे. वाहतूक पोलिसांनी नव्याने १५ सिग्नलची मागणी करूनही त्यावर कार्यवाही होत नाही. आता आणखी किती बळी गेल्यानंतर वा सुस्त प्रशासनाला जाग येणार? आणि पादचाऱ्यांना त्यांचा रस्त्यावरचा हक्क कथी परत मिळणार?

जबाबदार कोण? स्मार्ट सिटीचा निधी गेला कुठे?

शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च झाले, पण त्यातून पादचाऱ्यांसाठी एकही सुरक्षित भुयारी मार्ग का तयार करण्यात आला नाही?

अतिक्रमणांना अभय कुणाचे ?

शहरात नागरिकांना चालण्यासाठी असलेल्या फुटपाथवर टपऱ्या आणि बेकायदा पार्किंगचा विळखा आहे. या अतिक्रमणांना पाठीशी घालणाऱ्या मनपाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आणि अतिक्रमणकर्त्यांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई का केली जात नाही?

१८ सिग्रल बंद का?

शहरात बसवलेल्या ५२ पैकी १८ सिग्रल अनेक महिन्यांपासून बंद आहेत. याच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी मनपाची आहे. बेजबाबदार संबंधितांवर कारवाई का करण्यात येत नाही ?

पादचाऱ्यांसाठी वेळ का नाही?

शहरातील एकाही सुरू असलेल्या सिग्रलमध्ये पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी स्वतंत्र वेळ का ठेवलेला नाही? पादचान्यांच्या सुरक्षेबाबत पोलिस व मनपा गांभीर्याने विचार करत नाही. लोकांनी जीव मुठीत धरूनच चालावे, असा प्रशासनाचा नियम आहे का?

झेब्रा क्रॉसिंगवरील वाहनांना सूट ?

लाल सिग्रल असताना वेट झेब्रा क्रॉसिंगवर गाड्या उभ्या करणाऱ्या वाहनधारकांवर वाहतूक पोलिस दंडात्मक कारवाई का करत नाहीत?

तपासणी करून कारवाई करू लवकरच सर्व सिग्रलची तपासणी करण्यात पादचा-यांच्या सुरक्षेला प्राधान्य आहे. त्यांच्यासाठी सिग्रलमध्ये राखीव वेळ ठेवण्यासंदर्भात लवकरच उपाययोजना करण्यात येतील,
- जी. श्रीकांत, मनपा आयुक्त ,

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news