Fertilizers News : खरीप हंगामासासाठी जिल्ह्यात बियाणे, खतांचा पुरेसा साठा

शेतकऱ्यांना वेळेत कृषी निविष्ठा उपलब्ध करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Fertilizers News
Fertilizers News : खरीप हंगामासासाठी जिल्ह्यात बियाणे, खतांचा पुरेसा साठाfile photo
Published on
Updated on

Adequate stock of seeds and fertilizers available in the district for the Kharif season

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बियाणे व खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून, शेतकऱ्यांना नियोजनबद्ध पद्धतीने वेळेत कृषी निविष्ठा उपलब्ध करून द्याव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिले. जिल्हा नियोजन सभागृहात कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची बुधवारी (दि. २७) बैठक पार पडली.

Fertilizers News
Jalna News : १३०३ कोटींचे उद्दिष्ट; वाटप ४९ कोटी !

बैठकीस विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी, जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांच्यासह कृषी अधिकारी, निविष्ठा विक्रेते, वितरक व वाहतूकदार कृषी निविष्ठा संनियंत्रण समिती बैठकीला उपस्थित मान्यवर.

उपस्थित होते. जिल्ह्यात यंदा सुमारे ६ लाख ९७ हजार १८७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये कापूस लागवडीचे क्षेत्र सर्वाधिक असून त्यासाठी १७ लाख १३ हजार बियाणांच्या पाकिटांची आवश्यकता आहे. याशिवाय मका, तूर, सोयाबीन, मुग, उडीद, बाजरी व भुईमूग पिकांच्या लागवडीचेही नियोजन करण्यात आले आहे.

Fertilizers News
Chhatrapati Sambhajinagar News : पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील ६३ पुलांची तपासणी

सर्व पिकांसाठी मिळून ५१ हजार ७२५ क्विटल बियाणांची मागणी नोंदविण्यात आली असून, महाबीज, एनएससी व खासगी पुरवठादारांकडून पुरवठा होणार आहे. खरिपासाठी ३ लाख ९५ हजार ७४९ मे.टन खतांची मागणी अपेक्षित असून, युरिया, डीएपी, एनपीके, एमओपी व एसएसपी खतांचा समावेश आहे. जिल्ह्यासाठी मंजूर आवंटन टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

घरपोच खतासाठी आयएफएमएस प्रणाली

दरम्यान, शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे खतांची मागणी नोंदवून घरपोच पुरवठा करण्यासाठी आयएफएमएस प्रणालीअंतर्गत पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. खत विक्रीत लिंकिंग करून शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी गौडा यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news