Sambhajinagar News : मतदारयाद्यांची होणार बूथनिहाय पडताळणी, जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

दुबार नावांसमोर नोंद करणार
Sambhajinagar News
Sambhajinagar News : मतदारयाद्यांची होणार बूथनिहाय पडताळणी, जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावाFile Photo
Published on
Updated on

Booth-wise verification of voter lists will be done, review by the District Collector

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अंतिम केलेल्या मतदारयाद्यांची बूथनिहाय पडताळणी केली जाणार आहे. यामध्ये जी नावे दुबार आढळतील, त्यांच्या नावांसमोर दुबार नावे अशी नोंद करण्यात येणार आहे. दरम्यान, मतदार याद्यांसंदर्भात नागरिकांच्या आक्षेप व तक्रारींचे तत्काळ निराकरण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : जैन समाजाचा मूक मोर्चा ठरला लक्षवेधी

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सोमवारी मतदारयाद्यांबाबत आढावा बैठक घेतली. अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, डॉ. सुचिता शिंदे, एकनाथ बंगाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपालिकांचे मुख्याधिकारी आदी दूरदृष्य प्रणा लीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ रोजी मतदारयाद्या अंतिम केल्या आहेत. मात्र, त्यात दुबार नावे असल्याचे आक्षेप अनेक ठिकाणी घेण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी स्वामी यांनी निर्देश दिले की, प्रत्येक मतदार यादीची बूथनिहाय पडताळणी करावी.

Sambhajinagar News
Marathwada University : ...त्या महाविद्यालयांवर विद्यापीठाचा कारवाईचा बडगा

आपल्यामतदार याद्या ह्या बिनचूक असतील याबाबत खबरदारी घ्यावी. मतदार याद्यांसंदर्भात आलेल्या प्रत्येक तक्रारीचे निराकरण करण्यात यावे. तक्रारदारांचे शंकासमाधान करण्यात यावे. मतदार याद्यांवर घेतलेल्या आक्षेपांबाबत निर्णय घेण्यात यावा, असेही स्वामी म्हणाले. दरम्यान, दुबार मतदार नोंदणी संदर्भातील कार्यपद्धती राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिली आहे.

दुबार नावासंदर्भात कार्यपद्धती

दुवार नावांसंदर्भात प्राथमिक चौकशी करावी. दुबार नावे एकाच व्यक्तीची आहेत हे लक्षात आल्यानंतर तो मतदार एकच आहे याबाबत खात्री करावी. अशा मतदारांच्या नावांची यादी सूचना फलकावर, वेबसाईटवर प्रसिद्ध करावी. असे मतदार हे कोणत्या प्रभागात मतदान करणार आहेत याबाबत लेखी अर्ज करण्याचे त्यांना आवाहन करावे.

जे मतदार या आवाहनाला प्रतिसाद देऊन कोणत्या प्रभागात मतदान करणार आहेत हे कळवतील. मतदारांनी आवाहनास प्रतिसाद न दिल्यास मतदार यादीतील अशा सर्व नावांसमोर दुबार नाव अशी नोंद करावी. हे मतदार मतदानासाठी आल्यास केंद्रांध्यक्षांनी त्यांच्या ओळ-खपत्रावरून त्यांच्या खरेपणाविषयी खात्री पटल्यानंतरच मतदान करू द्यावे, असे यात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news