Motorcycle Theft Case : मोटारसायकल चोरीतील १४ वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद

ओळख बदलून परतूरमध्ये सुरू केले होते हॉटेल; गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई
Motorcycle Theft Case
Motorcycle Theft Case : मोटारसायकल चोरीतील १४ वर्षांपासून फरार आरोपी जेरबंदfile photo
Published on: 
Updated on: 

Accused in motorcycle theft case, absconding for 14 years, apprehended

कडेठाण, पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील पाचोड पोलिस ठाण्यात २०१२ मध्ये दाखल झालेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील तब्बल १४ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात पाचोड पोलिसांना यश आले आहे. सोनेसिंग प्रेमसिंग टाक (रा. शिवाजी चौक, जालना) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने आपली ओळख बदलून परतूर परिसरात हॉटेल सुरू केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी साध्या वेशात छापा टाकून त्याला ताब्यात घेतले.

Motorcycle Theft Case
knife attack : एमआयटी कॉलेजमध्ये भाईगिरी... अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यावर चाकूहल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१२ मध्ये फिर्यादी डॉ. ठोके यांनी मोटारसायकल चोरीप्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्यातील दोन आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र, सोनेसिंग टाक हा गुन्हा घडल्यापासून फरार होता.

पोलिसांनी त्याचा अनेकदा शोध घेतला; परंतु तो सापडला नव्हता.. दरम्यान, आरोपीने आपले अस्तित्व बदलून वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य केल्याचे समोर आले. पाचोड पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहायक पोलिस निरीक्षक सचिन पंडित यांनी एक पथक जालना येथे खाना केले. पथकाने संबंधित परिसरात दोन दिवस मुक्काम करून आरोपीचा शोध घेतला. यावेळी अंमलदार संदीप जाधव यांना आरोपी सुमारे दहा वर्षांपूर्वी परतूर परिसरात कामानिमित्त गेल्याची माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे अंमलदार संदीप जाधव, मनोज वैद्य आणि होमगार्ड गोविंद शेळके यांनी परतूर परिसरात शोधमोहीम राबवली. तपासादरम्यान आरोपीने परतूर येथे 'सैराट-२ ढाबा' नावाने हॉटेल सुरू केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी साध्या वेशात संबंधित ठिकाणी छापा टाकला असता आरोपी आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन पाचोड पोलिस ठाण्यात आणण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

Motorcycle Theft Case
Gangapur Crime News : राजीव गांधी चौकात तरुणावर टोळक्याकडून चाकूने जीवघेणा हल्ला

पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि पैठण उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पाचोडचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन पंडित, गोपनीय अंमलदार संदीप जाधव, मनोज वैद्य आणि होमगार्ड गोविंद शेळके यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

विशेष पोलिस महानिरीक्षकांची सुचना

सोमवारी (दि. २६) विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांनी गुन्हे आढावा बैठकीत फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेण्याबाबत सक्त सूचना दिल्या होत्या. त्यानुसार छत्रपती संभाजीनगरचे पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव आणि अपर पोलिस अधीक्षक प्रशांत स्वामी यांनी फरार आरोर्पीच्या अटकेसाठी विशेष पथक नेमून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.