Accident News : ट्रक-दुचाकीच्या अपघातात गंगाखेड न.पा.चे दोन कर्मचारी ठार

गंगाखेड येथील परळी नाक्यावरील भीषण घटना
Accident News
Accident News : ट्रक-दुचाकीच्या अपघातात गंगाखेड न.पा.चे दोन कर्मचारी ठारfile photo
Published on
Updated on

Accident News: Two employees of Gangakhed N.P. died in a truck-two-wheeler accident

गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा : शहरातील परळी नाका परिसरातील महाराणा प्रताप चौक येथे गुरुवारी (दि. १६) सायंकाळी सुमारे ५ वाजेच्या सुमारास ट्रक व दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात गंगाखेड नगर परिषदेचे दोन कर्मचारी जागीच ठार झाले.

Accident News
Parbhani Accident | परळी नाक्यावरील भीषण अपघातात गंगाखेड नगरपरिषदेचे दोन कर्मचारी जागीच ठार

मिळालेल्या माहितीनुसार, नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी शेख मुनवर शेख छोटूमिया (वय ४५) व नगर परिषदेतील सेवक संतोष प्रल्हादराव साळवे (वय ५०) हे एमएच-२२-ए एक्स-०५७४ क्रमांकाच्या मोटारसायकलवरून परळी नाका येथील एका हॉटेलमध्ये चहा घेतल्यानंतर परत निघाले होते.

त्याचवेळी परभणीकडे एमएच-३८-एक्स-९९७७क्रमांकाचा ट्रक आणि त्यांच्या मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेनंतर पालिकेतील दोघेही कर्मचारी ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. जाणारा दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, एका मृताच्या पोटावरून ट्रक गेल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

Accident News
Sambhajinagar Robbery | रस्त्यातील खड्ड्यांमुळे चोरट्यांनी डाव साधला; बँक कर्मचाऱ्यांकडील ५ लाखांची रोकड लुटली

घटनेची माहिती मिळताच गंगाखेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर दोन्ही मृतदेह गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले. शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू होती. गंगाखेड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या दुर्दैवी घटनेमुळे नगर परिषद कार्यालयासह शहरात शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news