gas cylinder thief गॅस सिलिंडर चोरणारा फरार आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

७ महिन्यांपासून देत होता गुंगारा; २० सिलिंडर जप्त
gas cylinder thief
gas cylinder thief गॅस सिलिंडर चोरणारा फरार आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यातfile photo
Published on
Updated on

Absconding gas cylinder thief nabbed by the Crime Branch

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गॅस एजन्सीमध्ये काम करताना गोदामातून सिलिंडर लंपास करणाऱ्या आणि गेल्या सात महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार असलेल्या एका आरोपीला शहर गुन्हे आरोपी शेख आयाज शाखेने गुरुवारी (दि. १०) बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचे २० व्यावसायिक गॅस सिलिंडर जप्त केले आहेत.

gas cylinder thief
Kunbi certificates : कुणबी प्रमाणपत्रांसाठी पहिल्याच दिवशी शिबिरांना गर्दी

शेख आयाज शेख शब्बीर (४५, रा. नारेगाव गल्ली नं. ६, माणिकनगर) असे आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, याप्रकरणी अंबिका विलासराव पाटील (२८, रा. एन-८, सिडको) यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार, ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सीपेट ग्राऊंड, एचपी कंपनीच्या बाजूला आणि शहानूरवाडी येथील श्री जगदंबा गॅस एजन्सी येथून सिलिंडर चोरीला गेल्याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यापासून (गेल्या ७महिन्यांपासून) आरोपी शेख आयाज हा फरार होता. गुरुवारी (दि. १०) गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना, आरोपी शेख आयाज हा घाटी दवाखाना परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली.

gas cylinder thief
Sambhajinagar News : वीज कंपन्यांचे खासगीकरण नाही, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

पथकाने घाटी परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीच्या एचपीसीएल कंपनीच्या प्रत्येकी १९ किलो वजनाच्या २० रिकाम्या व्यावसायिक गॅस टाक्या जप्त केल्या आहेत.

ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त (गुन्हे) शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक अर्जुन कदम, हवालदार राजेंद्र साळुंखे, योगेश गुप्ता, श्रीकांत काळे, मनोहर त्रिभुवन, विक्रम खंडागळे, संतोष चौर यांच्या पथकाने केली आहे.

वर्षभरात एक-एक करून चोरले सिलेंडर

आरोपी आयाज हा फिर्यादी यांच्या गॅस एजन्सीवर कामाला होता. वर्षभर त्याने एक-एक करून गोदामातून सिलिंडर लंपास केले. त्यानंतर शहरात विविध ठिकाणी त्याने हे सिलिंडर कमी किमतीत विक्री केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news