

सिडको : पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेल्या पोक्सो गुन्हातीत संशयीत आरोपी याला अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सीताफिने सापळा रचून हेडगेवार चौक या ठिकाणाहून ताब्यात घेऊन अटक केली. या नंतर पोलिस कोठडी संपल्याने पोलिसांनी त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात केली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला संशयित अतुल उर्फ लिंब्या प्रकाश तुंबडे याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावन्यात आली होती.
न्यायालयातून संशयितास दुपारी पवन नगर पोलीस चौकी येथे आणले असता पवन नगर चौकी येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा सुरु असता त्या संधीचा फायदा घेऊन संशयित तुबंडे हा पवननग पोलीस चौकीतून संधीचा फायदा घेऊन पोलिसांच्या हातावर तुरी देऊन दिवसा ढवळ्या फरार झाला होता. या घटनेनंतर अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सहायक पोलिस निरीक्षक विलास पडोळकर, पोलिस हवालदार योगेश देसले, मयुर पवार, सचिन करंजे, अनिल गाढवे, तुषार मते, संजय सपकाळे राकेश पाटील यांच्या पथकाने शोध मोहीम सुरु केली होती.
दरम्यान गुन्हे शोध पथकाचे पोलिस अंमलदार मयूर पवार यांना गोपनीय माहिती मिळाली की संशयित आरोपी हा हेडगेवार चौक या ठिकाणी फिरत आहेत त्यानुसार गुन्हे शोध पथकाने हेडगेवार चौक येथे सापळा रचला. दरम्यान पोलिसांना बघून संशयित आरोपीने त्या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र गुन्हे शोध पथकाने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले व अटक केली. या नंतर पोलिस कोठडी संपल्याने पोलिसांनी संशयित आरोपी अतुल उर्फ लिंब्या प्रकाश तुंबडे याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात केली.