

सिडको : बदलापूर येथील घटना ताजी असतानाच नाशिकमध्येही शाळकरी मुलीचा खाजगी क्लासच्या शिक्षकाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. नाशिकच्या सिडको उपेंद्रनगर भागात असलेल्या ज्ञानेश्वरी क्लासेस मध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल करून क्लासमधील शिक्षकाला अटक केली आहे.
सिडको उपेंद्रनगर भागात कृष्णा गजानन दहिभाते यांचा ज्ञानेश्वरी क्लासेस आहे. शिक्षकाने त्याच्याच क्लास मधील पाचवीत शिकणारी मुलगी एकटी असल्याचा फायदा घेऊन मुलीचा विनयभंग केला. या प्रकरणी सदर मुलीच्या आईने अंबड पोलिस ठाणे येथे फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी कृष्णा गजानन दहिभाते (वय ३२ ) याच्या विरोधात विनयभंग आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सविता उंडे करीत आहे.