पुंडलिकनगरात तरुणाला भोसकले, चाकूने सपासप वार

पोलिस ठाण्यापासून ५०० मीटर अंतरावरील घटना
Attack
AttackPudhari
Published on
Updated on

A young man was stabbed in Pundaliknagar, repeatedly attacked with a knife

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा

: एका तरुणाला दोघांनी पोटात, छातीत, पाठीत चार ते पाच वेळा चाकूने सपासप वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि.६) रात्री १ वाजेच्या सुमारास केसरिया कापड दुकानाजवळ, पारिजातनगर येथे घडली.

Attack
Sambhajinagar ZP Result 2026: छत्रपती संभाजीनगमध्ये भाजपची सरशी, शिंदेंची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर

रितेश अनिल कुऱ्हाडे (१८, रा. विश्रांतीनगर, गारखेडा परिसर) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. तर आरोपी बंटी ऑटोवाला (रा. हनुमाननगर) आणि नितीन ठोकळ पाटील (रा. मुकुंदवाडी) हे दोन आरोपी सध्या फरार आहेत.

जखमी रितेश हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी असून, त्याच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. रितेशची आई सुनीता कुऱ्हाडे (३५) यांच्या तक्रारीनुसार, रितेश हा शुक्रवारी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास बाहेर जाऊन येतो, असे सांगून घराबाहेर पडला होता.

Attack
E-rickshaws : आता ई-रिक्षासाठी परवाना, बॅज अनिवार्य

त्यानंतर रात्री १:३० वाजेच्या सुमारास रितेशचा मित्र ज्ञानेश्वर रोकडे हा घरी धावत आला. त्याने तुमचा मुलगा रितेश याला बंटी ऑटोवाला आणि नितीन ठोकळ या दोघांनी धारदार हत्याराने मारहाण केली आहे, मलाही धरून ठेवले होते. रितेश केसरीया कापड दुकानाजवळ पडलेला असल्याचे सांगितले.

सुनीता या ज्ञानेश्वर सोबत पारिजात नगर येथे पोहोचल्या. तेव्हा रितेश हा बदामाच्या झाडाखाली जमिनीवर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला होता. जखमी अवस्थेत रिक्षाने अगोदर पुंडलिकनगर ठाण्यात नेले. तेथून घाटीत दाखल केले. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. रितेशच्या छातीवर, पोटावर, पाठीवर चाकूने चार ते पाच वेळा वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक शिवप्रसाद कहऱ्हाळे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news