Crime News : हॉटेलमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला, चेहऱ्यावर ६० टाके

काचेच्या ग्लासने बेशुद्ध होईपर्यंत सपासप वार, पाच जणांवर गुन्हा
Sambhajinagar News
हॉटेलमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला, चेहऱ्यावर ६० टाकेPudhari News Network
Published on
Updated on

A young man was brutally attacked in a hotel, sustaining 60 stitches to his face.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बीड बायपास परिसरातील हॉटेल चुलांगणमध्ये १५ डिसेंबरच्या रात्री क्षुल्लक बाचाबाचीचे रूपांतर एका भीषण हल्ल्यात झाले असून, फायनान्स कर्मचाऱ्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तुला पाच मिनिटांत दाखवतो, अशी धमकी देऊन पाच जणांच्या टोळक्याने बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. या हल्ल्यात अमोल कल्याणकर नवथर (३५) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, काचेच्या ग्लासने सपासप वार केल्याने त्याच्या चेहऱ्यावर तब्बल ६० टाके पडले आहेत.

Sambhajinagar News
Paithan News | पैठण महिला समुपदेशन केंद्रात सुरु असलेले प्रकरण मिटविण्यासाठी आठ हजारची लाच ; दोन कंत्राटी समुपदेशक अटकेत

जखमी नवथर यांनी जबाब दिल्यानंतर सोमवारी (दि.२२) पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात आरोपी योगेश खरात, आदित्य कोल्हे, शाम पो पळघट आणि अनोळखी दोन या टोळक्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

फिर्यादी अमोल नवथर (रा. काव्या रेसिडेन्सी, बीड बायपास) हे १५ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास मित्रांसोबत हॉटेल चूलांगणमध्ये जे वणासाठी गेले होते. तेथे हॉटेल मालक सचिन मुंढे, विशाल लाहमगे, भरत मुंढे यांच्यासोबत जेवण करण्यास बसले. बाजूच्या टेबलवरच ओळखीचे आकाश शिंदे आणि प्रवीण नरवडे हे येऊन बसल्याने नवथर त्यांच्यासोबत जाऊन बसले.

Sambhajinagar News
Crime News : सराईत गुंडांचा मुकुंदवाडीत तलवारीसह नंगानाच; पोलिसांचा धाक संपला ?

तिथे आरोपी योगेश खरात आला. तोही जेवण करण्यासाठी बसला. त्यावेळी तो नवथर यांना अश्लील व आक्षेपार्ह बोलला. त्यावरून दोघांमध्ये वाद उफाळून आला. खरातने तुला पाच मिनिटांत दाखवतो, असे म्हणत फोन करून साथीदारांना बोलावून घेतले. खरातचा फोन येताच आदित्य कोल्हे, शाम पोपळघट आणि इतर दोन अन-ओळखी तरुण हॉटेलमध्ये घुसले. आज याला जिवंत सोडायचे नाही, अशी चिथावणी खरातने देताच टोळक्याने अमोल यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी शाम पोपळघट याने काचेचा ग्लास अमोल यांच्या कपाळावर जोराने मारून फोडला. या हल्ल्यात अमोल यांच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या आणि ते रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडले. हॉटेलमधील इतर नागरिकांनी मध्यस्थी करत भांडण सोडवले आणि जखमीला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले.

बायपासवर रात्रभर गुन्हेगारांचा वावर

पुंडलिकनगर आणि सातारा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत बीड बायपासवरील अनेक हॉटेलमध्ये रात्रभर बिनबोभाटपणे दारूचा महापूर येतो. बारचा परवाना नसताना अनेक ठिकाणी दारू पिण्यासाठी बिनधास्तपणे बसण्याची सोय केली जाते. त्यामुळे गुन्हेगार रात्रभर बायपासवर मुक्तपणे फिरताना दिसून येतात. अनेकवेळा लुटमारीच्या घटना याच भागात अधिक प्रमाणात होताना समोर येऊनही स्थानिक पोलिसांकडून याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जाते.

चेहऱ्याची झाली चाळण

जखमी अमोल यांना तातडीने जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. शुद्धीवर आल्यानंतर त्यांना समजले की, त्यांच्या कपाळावर, नाकावर आणि उजव्या डोळ्याच्या खाली खोल जखमा झाल्या असून, डॉक्टरांनी त्यांना एकूण ६० टाके घातले आहेत. ही घटना इतकी भीषण होती की, अमोल यांचा जीव थोडक्यात वाचला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news