जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याने पैठणला जीवन संपवले

२०२३ मध्ये शांतीलाल तान्हा ओझरे हा बंदी जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी नाशिक कारागृहातून पैठण येथील जिल्हा खुले कारागृहात येथे वर्ग झालेला होता.
Paithan News
जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याने पैठणला जीवन संपवलेPudhari Photo
Published on
Updated on

A prisoner serving a life sentence ended his life in Paithan

पैठण, पुढारी वृत्तसेवा पैठण ते शेवगाव मार्गावरील येथील जिल्हा खुले कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यानी शुक्रवारी ( दि.२३) सकाळी कारागृहाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत चिंचाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास लावून जीवन संपवले.

Paithan News
युतीमुळे भाजप-शिवसेनेतील निवडणुकीची गणिते बदलली

बंदीचे नाव शांतीलाल तान्ह्य ओझरे (वय ४४ वर्ष रा. पालघर) असे आहे. २०२३ मध्ये शांतीलाल तान्हा ओझरे हा बंदी जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी नाशिक कारागृहातून पैठण येथील जिल्हा खुले कारागृहात येथे वर्ग झालेला होता.

या बंदिनी शुक्रवारी सकाळी कारागृहाच्या भिंतीच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत चिंचेच्या झाडाला दोरीने गळफास घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. याची माहिती पैठण खुले कारागृह अधीक्षक राजेंद्र निमगडे यांना देण्यात आली.

Paithan News
Leopard News : टाकळी परिसरात बिबट्याचा वावर

पैठण पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांना याबाबत सांगितल्यानंतर खुले कारागृह येथे नायब तहसीलदार राहुल बनसोडे, पोलिस निरीक्षक महादेव गोमारे, उपनिरीक्षक संभाजी खाडे, उपनिरीक्षक अजीज शेख, पोकॉ महेश माळी, अंधारे, तांबे, लक्ष्मण पुरी, ढाकणे यांनी पंचनामा केला. उपनिरीक्षक अजिज शेख पुढील तपास करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news