Auric Industrial City : ऑरिकमधील तब्बल ५२० एकर निवासी जमीन औद्योगिक वापरासाठी रूपांतरित

लवकरच मोठी गुंतवणूक, प्रकल्प आकर्षित होण्याची आशा
Auric Industrial City
Auric Industrial City : ऑरिकमधील तब्बल ५२० एकर निवासी जमीन औद्योगिक वापरासाठी रूपांतरितfile photo
Published on
Updated on

A massive 520 acres of residential land in AURIC converted for industrial use

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : उद्योगांकडून वाढत्या मागणीमुळे ऑरिक (औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी) मधील आणखी ५२० एकर जमीन निवासी वापरातून औद्योगिक वापरासाठी रूपांतरित करण्यात आली आहे. या निर्णयामुळे ऑरिकमध्ये मोठ्या गुंतवणुकीसाठी आवश्यक असलेली सलग जमीन उपलब्ध होणार असून, लवकरच एका मोठ्या औद्योगिक प्रकल्पाची गुंतवणूक आकर्षित होण्याची शक्यता आहे.

Auric Industrial City
Bidkin Industrial Project : बिडकीनमध्ये उनो मिंडा करणार 550 कोटींची गुंतवणूक

सध्या ऑरिक मध्ये एकूण ३३२ भूखंडांचे वाटप झाले असून, सुमारे ३,४३४ एकर जमीन उद्योगांसाठी वितरित करण्यात आली आहे. त्यापैकी ३,२८४ एकर क्षेत्र औद्योगिक वापरासाठी असून, बिडकीन येथे टोयोटा किर्लोस्कर मोटर्स, जेएसडब्ल्यू, अथर, पिरॅमल तर शेंद्रा येथे ह्योसंग कंपनी ही प्रमुख अँकर गुंतवणूकदार म्हणून कार्यरत आहे. उद्योगांच्या वाढत्या प्रतिसादामुळे उपलब्ध औद्योगिक जमिनीची मागणी सातत्याने वाढत आहे.

त्यामुळे ५२० एकर जमीन निवासी वापरातून औद्योगिक वापरासाठी रूपांतरित करण्यात आली आहे. या निर्णयामुळे मोठ्या उत्पादन क्षेत्रातील, इलेक्ट्रिक वाहन, अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स तसेच निर्याताभिमुख उद्योगांना आकर्षित करण्यासाठी आवश्यक जमीन उपलब्ध होणार आहे.

अत्याधुनिक पायाभूत सुविधा

दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर (डीएमआयसी) अंतर्गत विकसित ऑरिकमधील शेंद्रा बिडकीन औद्योगिक क्षेत्र हे देशातील सर्वात महत्त्वाच्या औद्योगिक स्मार्ट सिटी प्रकल्पांपैकी एक असून, पहिल्या टप्प्यात सुमारे ४०.२ चौ.कि.मी. क्षेत्राचा विकास करण्यात येत आहे. या दोन्ही औद्योगिक क्षेत्रांमध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत.

Auric Industrial City
Arapur MIDC project : अखेर आरापूर औद्योगिक वसाहतीसाठी मोजणीला सुरूवात

केंद्राने अर्थसहाय्य करावे

ऑरिकमध्ये सुमारे ७७१ एकर औद्योगिक जमीन तसेच २,०३९ एकर व्यावसायिक, निवासी व इतर वापराची जमीन उपलब्ध आहे. भविष्यातील वाढती गुंतवणूक लक्षात घेता दुसऱ्या टप्प्यातील जमीन संपादन प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. यासाठी लागणार आवश्यक निधी ऑरिक - एमआयटीएल स्वतः उभारणार असून, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्र सरकारने घोषणा केल्याप्रमाणे अर्थसहाय्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news