Arapur MIDC project : अखेर आरापूर औद्योगिक वसाहतीसाठी मोजणीला सुरूवात

पहिल्या दिवशी 63.51 हे आर जमिनीची मोजणी, दहा दिवस चालणार प्रक्रिया
Arapur MIDC project
नवीन आरापूर औद्योगिक वसाहतीसाठी प्रत्यक्ष जमीन मोजणीप्रसंगी उपस्थित अधिकारी.pudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : आरापूर येथील प्रस्तावित औद्योगिक वसाहतीच्या भूसंपादनासाठी अखेर बुधवार(दि.6)पासून प्रत्यक्ष जमीन मोजणीला सुरुवात झाली. एकूण 762.093. हेक्टर क्षेत्रापैकी पहिल्या दिवशी 63.51 हे आर जमिनीची मोजणी करण्यात आली. दरम्यान, पुढील दहा दिवस मोजणीची प्रक्रिया चालणार असल्याची माहिती एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी दिली.

औद्योगिक वसाहतीमधील वाळूज, शेंद्रा आणि बिडकीन येथील जमीन जवळपास संपल्याने अनेक नामांकित कंपन्या, मोठे उद्योग प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे मौजे आरापूर, गवळी शिवरा व मौजे सुलतानाबाद येथील 753 हेक्टर जमीन औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केली आहे. यासोबतच सरकारी 9.60 हेक्टर अशा एकूण 762.093. हेक्टर क्षेत्रावर नवीन औद्योगिक वसाहत निर्माण करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. मात्र,जून 2025 मध्ये अधिसूचना निघूनही अद्यापपर्यंत प्रत्यक्ष भूसंपादन सुरु झालेले नाही.

Arapur MIDC project
Chandrapur News | शेतकरी– सिमेंट कंपनी वाद: कुसुंबी-नोकारीत प्रत्यक्ष मोजणीचा निर्णय; जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

जमिनीचे दर आणि वाटाघाटीच्या बैठका निष्फळ ठरल्या होत्या. अखेरीस 24 एप्रिल रोजी शेतकरी आणि प्रशासनात झालेल्या बैठकीत 90 टक्के शेतकऱ्यांनी भूसंपादनासाठी होकार दिला. या मोजणी प्रकियेला बुधवारी तीन पथकांमार्फत सुरुवात करण्यात आली आहे. शेतकरी, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अमित भामरे यांच्यासह यांत्रिकी विभाग,वन विभाग, कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Arapur MIDC project
उद्योग अडचणीत; उद्योगमंत्री संभाजीनगरात

सुलतानाबाद येथे मोजणीला विरोध

आरापूर, गवळी शिवरा आणि सुलतानाबाद या गावात एकाच वेळी स्वतंत्र पथकामार्फत जमीन मोजणीला सुरुवात करण्यात आली. आरापूर, गवळी शिवरा येथे मोजणी सुरळीत पार पडली. मात्र, सुलतानाबाद येथे काही शेतकऱ्यांनी विरोध केला. आधी जमिनीचे दर ठरवा नंतरच मोजणी करा, अशी मागणी केली. त्यामुळे त्या शेतकऱ्यांची जमीन सोडून पुढची मोजणी करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

उद्योगांसाठी होणार दारे खुली...

ऑरिक सिटी अंतर्गत असलेली जमीन आता संपली असली तरी येणाऱ्या उद्योगांची संख्या सुरूच आहे. मागील वर्षभरात अथर, टोयोटा किर्लोस्कर, पिरामल फार्मा अशा कितीतरी मोठ्या कंपन्यांनी आपली प्रक्रिया पूर्ण करत प्रकल्प स्थापनेसाठी सुरुवात केली आहे. दरम्यान, उद्योगनगरीतील लॅण्डबँक आटल्याने उद्योगांकडून जागेची शोधाशोध सुरू आहे. यात नवीन आरापूर औद्योगिक वसाहतीमुळे अनेक नवउद्योग, कंपन्यांना दारे खुली होणार आहे.

पहिल्या दिवशीची झालेली मोजणी

गाव - मोजणी झालेले क्षेत्र

गवळी शिवरा - 39.08 हे. आर.

आरापूर - 10.13 हे. आर.

सुलतानाबाद - 14.30 हे. आर.

एकूण - 63.51 हे. आर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news