जालना रोडवर कार, रिक्षाच्या पाठलागात भीषण अपघात

एका किरकोळ धक्क्यावरून सुरू झालेला वाद पाठलागापर्यंत गेला आणि त्याचे पर्यवसान भीषण अपघातात झाले.
jalna news
जालना रोडवर कार, रिक्षाच्या पाठलागात भीषण अपघातfile photo
Published on
Updated on

A horrific accident occurred on Jalna Road during a chase involving a car and a rickshaw

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील गजबजलेल्या जालना रोडवर बुधवारी (दि. ५) रात्रीच्या सुमारास एखाद्या चित्रपटात शोभेल असा थरार पाहायला मिळाला. एका किरकोळ धक्क्यावरून सुरू झालेला वाद पाठलागापर्यंत गेला आणि त्याचे पर्यवसान भीषण अपघातात झाले.

jalna news
चिमुकल्याच्या घशात बदाम अडकला

भरधाव रिक्षाने विरुद्ध दिशेने (रॉन्ग साईड) जाऊन दुचाकीला उडवले, तर पाठलाग करणाऱ्या कारने रिक्षाचा चुराडा केला. या घटनेत रिक्षाचालक आणि दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून, कारमधील तिघे जखमी झाले आहेत. ही घटना ५ फेब्रुवारीला रात्री १० वाजेच्या सुमारास चिकलठाणा भागात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धूत हॉस्पिटल चौकात एका रिक्षाचा इर्टिगा कारला धक्का लागला. यावरून कारचालक आणि रिक्षाचालकामध्ये शाब्दिक चकमक झाली. वाद वाढताच रिक्षाचालकाने तेथून चिकलठाण्याच्या दिशेने रिक्षा पळवली.

jalna news
मुर्डेश्वर दरीत पडल्याने महाराजांचा मृत्यू

रिक्षा पळाल्याचे पाहून कारचालकानेही त्याचा पाठलाग सुरू केला. या धडकेने दुचाकीस्वार हवेत उडून दूरवर फेकला गेला. त्याच वेळी, वेगात पाठलाग करणाऱ्या कारनेही रिक्षाला मागून जोरदार धडकन दिली. या विचित्र अपघातात रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. रिक्षाचालक आणि दुचाकीस्वार दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news