

A fly fell in the food; Beating up for asking for another parcel
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: हॉटेलमधील पार्सल जेवणामध्ये माशी पडल्याने दुसरे पार्सल मागण्यासाठी आलेल्या ग्राहकाला टोळक्याने बेदम मारहाण केली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.१२) रात्री साडेनऊच्या सुमारास देवळाई परिसरातील हॉटेल सागरच्या परिसरात घडला. या प्रकरणी ७ ते ८ जणांच्या अज्ञात टोळक्यावर चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सतीश कडूबा मगरे यांच्या तक्रारीनुसार, पार्सल जेवणात माशी पडलेली होती. त्यामुळे दुसरे पार्सल मागण्यासाठी गेल्यावर त्यांचा वाद झाला. यात अज्ञात टोळक्याने त्यांना लाठी, लोखंडी रॉडने मारहाण केली. यात त्यांना गंभीर दुखापत झाली असून, जिवे मारण्याचीही धमकी दिली आहे. या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात आर- ोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास हेडकॉन्स्टेबल निवृत्ती मदणे करत आहेत.