Sambhajinagar News : मृत शिक्षकाच्या जात वैधतेअभावी पत्नीची पेन्शन रोखता येणार नाही

शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश हायकोर्टाकडून रद्द; १२ आठवड्यांत थकबाकीसह पेन्शन देण्याचे निर्देश
Sambhajinagar News
Sambhajinagar News : मृत शिक्षकाच्या जात वैधतेअभावी पत्नीची पेन्शन रोखता येणार नाहीfile photo
Published on: 
Updated on: 

A deceased teacher's wife cannot be denied a pension due to the lack of a caste validity certificate

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मृत शिक्षकाचे जात वैधता प्रमाणपत्र नसल्याच्या कारणावरून त्यांच्या विधवा पत्नीचे कुटुंब निवृत्ती वेतन नाकारता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. नितीन बी. सूर्यवंशी व न्या. आबासाहेब डी. शिंदे यांनी दिला. शिक्षणाधिकाऱ्यांचा पेन्शन नाकारण्याचा आदेश रद्द करत, याचिकाकर्त्या महिलेला १२ आठवड्यांत थकबाकीसह पेन्शन देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : हर्सूलच्या आगीतील दोषींवर कारवाई का नाही ? नगरसेवकांचा प्रशासनाला जाब

सोयगाव तालुक्यातील निंबायती येथील जाकिया मनवर तडवी (४६) यांचे पती मनवर रज्जाक तडवी हे शिक्षक म्हणून कार्यरत होते. १९९७ मध्ये सेवेत रुजू झालेल्या तडवी यांचा ३ मे २००५ रोजी अपघाती मृत्यू झाला. पतीच्या निधनानंतर मुलांच्या उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करणाऱ्या जाकिया यांनी डिसेंबर २००६ मध्ये कुटुंब निवृत्ती वेतनासाठी प्रस्ताव दाखल केला.

मात्र, वारस प्रमाणपत्र, उत्तराधिकारी प्रमाणपत्र आणि सेवापुस्तिका गहाळ झाल्याच्या कारणांमुळे प्रस्ताव अनेक वर्षे प्रलंबित राहिला. सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही पती भिल्ल प्रवर्गातून सेवेत रुजू झाले होते आणि त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र सादर नसल्याचे कारण देत शिक्षणाधिकाऱ्यांनी १६ डिसेंबर २०२४ रोजी पेन्शनचा प्रस्ताव फेटाळला.

Sambhajinagar News
Crime News : पोलिस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच तोळ्यांची सोनसाखळी लांबवली

या निर्णयाविरोधात जाकिया यांनी अॅड. देविदास शेळके यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. सुनावणीदरम्यान जिल्हा परिषदेने शिक्षकाची दहा वर्षे सेवा झाली नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियम, १९८२ मधील नियम १३८ (अ) (२) न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला.

या नियमानुसार सेवेत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याची सात वर्षांपेक्षा अधिक सेवा असल्यास कुटुंब निवृत्ती वेतनाची तरतूद आहे. संबंधित शिक्षकाची आठ वर्षे सेवा झाल्याने पेन्शनची पात्रता पूर्ण होत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. सुनावणीअंती न्यायालयाने शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश रद्द केला आणि जाकिया यांना १२ आठवड्यांत थकबाकीसह कुटुंब निवृत्ती वेतन देण्याचे निर्देश दिले. शासनातर्फे सहायक सरकारी वकील एस.आर. वाकळे, तर जिल्हा परिषदेतर्फे अॅड. राहुल ए. तांबे यांनी बाजू मांडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.