पैठणमध्ये ३२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन संपवले जीवन

पॉवर हाऊस परिसरातील घटना
End of Life News
पैठण शहरात राहणाऱ्या एका ३२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले.file photo
Published on
Updated on

पैठण : शहरातील पॉवर हाऊस परिसरात राहणाऱ्या एका ३२ वर्षीय तरुणाने गळफास घेवून जीवन संपवल्याची घटना बुधवारी (दि.१६) घडली. या तरुणाने आत्महत्या का केली या संदर्भात रात्री उशिरापर्यंत पोलीस माहिती घेत होते. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव किरण धर्मराज आव्हाड (वय ३२, रा. पावर हाऊस, दत्त मंदिर रोड, पैठण) असे आहे.

End of Life News
आरक्षणासाठी मराठा युवकाने जीवन संपवले

अधिक माहिती अशी की, पैठण शहरातील पावर हाऊस परिसरात दत्त मंदिर रोड लगत राहणाऱ्या किरण धर्मराज आव्हाड या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेवून जीवन संपवल्याची घटना घडली. सदर तरुणाला बेशुद्ध अवस्थेत नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात रात्री सात वाजता उपचारासाठी दाखल केले होते, परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या तरुणाला तपासून मृत घोषित केले. या घटनेची पैठण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महेश माळी हे करीत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news