

A 28-year-old man is missing, and his family suspects kidnapping.
कन्नड, पुढारी वृत्तसेवा : शहरातील श्रीराम कॉलनी येथील ईश्वर लक्ष्मण चालक (वय २८) हा तरुण वेपत्ता झाल्याची नोंद शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पत्नी अर्पिता ईश्वर चालक (वय २६) यांनी पोलिस ठाण्यात सोमवारी (दि.आठ) तक्रार नोंदवली.
तक्रारीनुसार ईश्वर चालक हे ७डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता बाहेर जातो असे सांगून घरातून निघून गेले. त्यानंतर त्यांचा मोबाईल फोनही बंद येत असून ते घरी न परतल्याने बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली. सदर तरुणाचा रंग गोरा, उंची अंदाजे ५ फूट ५ इंच, अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट, काळी पॅन्ट पायात काळ्या रंगाची चप्पल, दोन्ही कानात सोन्याच्या बाळ्या, उजव्या हातात चांदीचे कडे, उजव्या हाताच्या बोटात राजमुद्रा असलेली अंगठी असून त्यास मराठी, हिंदी भाषा बोलता येते. असे वर्णन असलेला तरुण आढळल्यास शहर पो. ना. मोईस वेग कन्नड शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पती ईश्वर लक्ष्मण चालक हे सायंकाळी ५ वाजल्यापासून बेपत्ता झाले असून त्यांच्या बेपत्तेपणामागे अपहरणाचा संशय असल्याचे त्यांच्या पत्नी अर्पिता यांनी लेखी तक्रारीत पोलिसांना कळवले आहे.
ईश्वर चालक खासगी कंपनीत कलेक्शन असोसिएट म्हणून काम करत असून जुन्या वाहनांच्या देवानघेवाणीतही ते व्यवहार करीत होते. काही दिवसांपासून त्यांना धमकीचे कॉल येत असल्याचे त्यांनी पत्नीला फोन करून सांगितले होते. पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल असून त्यांच्या पत्नीच्या अर्ज मागणीनुसार पोलिस तपास करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक आर. बी. सानप यांनी दिली.