Garbage depot : शहरातील ८.५० लाख मेट्रिक टन कचरा प्रक्रियेविनाच पडून

नारेगाव, पडेगाव डेपोत साचलेल्या कचऱ्यावर करणार बायोमायनिंगद्वारे प्रक्रिया
Garbage depot
Garbage depot : शहरातील ८.५० लाख मेट्रिक टन कचरा प्रक्रियेविनाच पडूनpudhari photo
Published on
Updated on

8.50 lakh metric tonnes of the city's waste lies unprocessed

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील नारेगाव आणि पडेगाव येथील कचरा डेपोमध्ये सुमारे ८.५० लाख मेट्रिक टन कचरा प्रक्रियेविना साचून असल्याची माहिती बुधवारी (दि.२७) महापालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या संपूर्ण टप्प्याटप्प्याने बायोमायनिंग प्रक्रिया करून पुढील वर्षी पावसाळ्यापूर्वी डेपोमधील कचऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी कचऱ्यावर लावण्याचा प्रशासनाचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Garbage depot
Sambhajinagar News : पडेगाव कचरा डेपोतील धूर, दुर्गंधीवर महापौरांचा ॲक्शन प्लॅन

महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कामकाजाचा बुधवारी आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना येडगे बोलत होते. यावेळी त्यांनी जुन्या कंत्राटदारामार्फत करण्यात आलेल्या कचरा प्रक्रियेचा तपशील, शिल्लक काम आणि निविदेनुसार असलेल्या जबाबदाऱ्यांची माहिती घेतल्याचे सांगितले. तसेच विद्यमान निविदेअंतर्गत उपलब्ध कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार असून, उर्वरित कचऱ्यासाठी नव्याने निविदा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Garbage depot
Padegaon garbage depot : पडेगाव कचरा डेपोसमोर ठाकरे सेना-वंचितचा रास्ता रोको

पडेगाव कचरा डेपोतील आग नियंत्रणात

पडेगाव येथील कचरा डेपोला लागलेली आग आता नियंत्रणात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. तसेच कोणीतरी ही आग मुद्दाम लावण्यात आल्याची शक्यता व्यक्त करत भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी डेपो परिसरात पत्र्याचे संरक्षक कुंपण उभारण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती आयुक्त अमोल येडगे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news