बीफ कंपन्यांकडून भाजपला ५ हजार कोटींचे इलेक्टोरल बाँड : असदुद्दीन ओवेसी | पुढारी

बीफ कंपन्यांकडून भाजपला ५ हजार कोटींचे इलेक्टोरल बाँड : असदुद्दीन ओवेसी

छत्रपती संभाजीनगर : देशातील लोकशाही धनदांडग्याच्या हातात गेली आहे. देशाचे पंतप्रधान मांसाहार करण्यास एकीकडे विरोध करतात, तर दुसरीकडे भाजपने बीफ कंपन्यांकडून ५ हजार कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड कसे घेतले, अशी घणाघाती टीका आज (दि.१५) एमआयएमचे अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवेसी यांनी केली.

लोकसभा निवडणुकीत एमआयएम उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात आयोजित सभेत ते बोलत होते. भाजप, काँग्रेस, शिवसेनासह सर्वच राजकीय पक्षांना इलेक्टोरल बाँड मिळाले आहे. मात्र आम्हीच जेम्स बाँड असल्याने बाँड घेतले नाही. एमआयएमचा मराठा, धनगर व मुस्लिम आरक्षणाला पाठिंबा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. वाढती बेरोजगारी व महागाई, शेतकऱ्यांचे जीवन संपवणे यावर राज्यकर्ते बोलत नसल्याचा आरोप करत खा.इम्तियाज जलील यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नावर सभागृहात आवाज उठविल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button