Lufthansa Airlines :’त्‍या’ पती-पत्‍नीचं भांडण विमानात रंगलं; बँकॉकला निघालेलं विमान दिल्‍लीतचं उतरवलं | पुढारी

Lufthansa Airlines :'त्‍या' पती-पत्‍नीचं भांडण विमानात रंगलं; बँकॉकला निघालेलं विमान दिल्‍लीतचं उतरवलं

पुढारी ऑनलाईन डेस्क : पती-पत्नीमधील भांडणाला मोठे कारण लागत नाही, असे अनेक किस्से घडत असतात. मात्र, पतीपत्नीच्या भांडणामुळे चक्क विमान दुसरीकडे वळवावे लागल्याचा प्रकार घडला आहे. लुफ्थांसा एअरलाइन्सचे विमान (LH772) म्युनिकहून बँकॉकला आज (दि.२९) सकाळी निघाले होते. परंतु, हे विमान दिल्लीकडे वळवण्यात आले. सुरक्षा कर्मचारी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले असल्याची माहिती दिल्ली विमानतळाच्या सूत्रांनी दिली. Lufthansa Airlines

पती-पत्नीच्या भांडणामुळे इमर्जन्सी लँडिंग

विमानात चढताना एका जोडप्याने वाद घालण्यास सुरुवात केली आणि दोघांमध्ये वाद वाढल्याने केबिन क्रूने फ्लाइट वळवण्याचा निर्णय घेतला, असे सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले. केबिन क्रूने पहिल्यांदा पाकिस्तानला विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्याची विनंती केली. परंतु, पाकिस्तानने ही विनंती फेटाळल्यानंतर दिल्लीत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. Lufthansa Airlines

Lufthansa Airlines : पती-पत्नीला विमानातून बाहेर काढले

पती-पत्नीमधील भांडणाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, परंतु पती-पत्नीच्या भांडणामुळे विमान वळवावे लागले आहे, असे दिल्ली विमानतळाच्या विमान सुरक्षा रक्षकांनी एएनआयला सांगितले. पती-पत्नीला फ्लाइटमधून काढून टाकण्यात आले आहे. त्याचबरोबर विमानात बसलेले सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

दिल्लीला येणारे विस्तारा विमान वळवण्यात आले होते.

काही दिवसांपूर्वी खराब हवामानामुळे दिल्ली विमानतळावरील हवाई वाहतूक विस्कळीत झाल्याने राजधानीकडे येणारी विस्ताराची दोन उड्डाणे अन्य दोन ठिकाणी वळवण्यात आली होती. कोलकाताहून दिल्लीला येणारे पहिले विमान लखनौला वळवण्यात आले. दुसरे विमान, जे गुवाहाटीहून दिल्लीला येणार होते, ते जयपूरला वळवण्यात आले होते.

हेही वाचा 

Back to top button