Chhatrapati Sambhajinagar : पाच वर्षात वीज अपघाताने घेतले ६ हजार ७१७ जणांचे बळी

महावितरणच्या उपाययोजना गांभीर्याने घेण्याची गरज
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar : पाच वर्षात वीज अपघाताने घेतले ६ हजार ७१७ जणांचे बळी(File Photo)
Published on
Updated on

6,717 people died due to electrical accidents in five years

जे.ई. देशकर

छत्रपती संभाजीनर विशेष : पावसाळ्यात वीज अपघात मोठ्या प्रमाणात होतात. महावितरण सूचना आणि उपाययोजना करते, परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्याने आपल्यावर जीव गमावण्याची वेळ येते. या व इतर कारणांमुळे गत पाच वर्षांत वीज अपघातात सुमारे ६ हजार ७१७ जणांना जीव गमावावा लागला. यात २ हजार ९६५ जण जखमी आहेत तसेच ६ हजार ४१४ प्राण्यांनाही जीव गमवावा लागला. वीज वापरताना योग्य काळजी घेतली नाही, तर विद्युत अपघात घडून नुकसान होऊ शकते. सर्वांनी सुरक्षिततेचे नियम पाळले तर हे अपघात टाळता येतात.

Chhatrapati Sambhajinagar
Female Kirtankar Murdered | महिला कीर्तनकाराची हत्या जमिनीच्या वादातून झाल्याचा संशय

वीज अपघात टाळण्यासाठी दर्जेदार उपकरणांचा वापर, प्रमाणित ठेकेदारांकडूनच विद्युतीकरणाची कामे करून घ्यावीत. योग्य क्षमतेचे एमसीबी (मिनिएचर सर्किट ब्रेकर) वापरावेत, जेणेकरून अतिभार किंवा शॉर्टसर्किटमुळे धोका निर्माण होणार नाही. योग्य प्रकाराची अर्थिग न केल्यामुळे अनेक अपघात घडल्याचे समोर आले आहेत. त्यामुळे वायरिंग इन्स्टॉलेशनसाठी कॉपर प्लेट किंवा कॉपर रॉडची अर्थिंग कार्यक्षमपणे घेणे सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचे आहे.

इन्सुलेटेड वायरचा उपयोग, पावसाळ्यात मीटर रूममध्ये पाणी जाणार नाही; त्याचबरोबर भिंती ओल्या होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. मेन स्विचचा वापर, पंखे, इस्त्री, कूलर वापरताना त्यात वीजप्रवाह उतरू शकतो. याची जाणीव ठेवूनच सावधानतेने ती हाताळावीत. अशा सूचना वेळोवेळी महावितरणकडून दिल्या जातात.

Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar : जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे

महावितरणच्या उपाययोजना

महावितरणकडून दरवर्षी मान्-सूनपूर्व देखभालीत विद्युत तारांना धोका ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटण्यात येतात.

धोकादायक रोहित्रे, वितरण पेट्या, तारा दुरुस्त केल्या जातात.

विद्युत सुरक्षेबाबत नागरिकांचे नियमित प्रबोधन करण्यात येते.

दैनंदिन वीज वापरातील महत्त्वाच्या बाबी

विद्युत उपकरणे ओल्या हाताने हाताळू नका.

वीज वाहिनीच्या खाली किंवा जवळ बांधकाम करू नये.

विद्युत खांब किंवा तणाव तारांना गुरे, बांधू नका.

कूलरमध्ये पाणी टाकताना वीजपुरवठा बंद ठेवा.

विजेच्या तारेखाली कापलेले पीक ठेवू नका.

कपडे वाळवण्यासाठी वीज तारांचा वापर करू नका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news