छत्रपती संभाजीनगर : भराडी येथील दुकाने आगीच्या भक्षस्‍थानी

भराडी येथील दुकानांना आग
भराडी येथील दुकानांना आग
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील कन्नड सिल्लोड रस्त्यावरील दुकानांना (शुक्रवार) रात्री साडेबारा ते एक वाजण्याच्या दरम्यान अचानक आग लागली. या आगीत एक किराणा दुकान व एक मिठाई भांडार या दोन प्रमुख दुकानांसह १४ दुकाने जळून खाक झाली. या आगीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात दुकानदारांचे आर्थिक नुकसान झाले असून पीडितांचे कुटुंबीय रस्त्यावर आले आहेत.

या घटनेची माहिती ग्राम सुरक्षा दलाच्या ॲपवरून दिल्याने तातडीने गावातील लोकांनी आग विझविण्यासाठी मदत केली. स्थानिक पाणी ट्रॅक्टर, टँकर तसेच सिल्लोड नगर परिषदेचे अग्निशामक दल तातडीने दाखल झाले. त्याप्रमाणे संभाजीनगर येथील दोन अग्निशमन दलांना पाचारण करण्यात आले होते. या प्रमाणे सर्व बाजूंनी आग विझविण्यासाठी झालेल्या प्रयत्नांना यश आल्याने मोठा अनर्थ टळला. उपसरपंच गजानन पाटील महाजन, सरपंच पप्पू जगनाडे, चेअरमन अनिस पठाण, माजी उपसभापती काकासाहेब राकडे आदींसह गावातील सर्वसामान्य नागरिकांची आग विझविण्यासाठी मदत झाली.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news