Sambhajinagar News : बेगमपुऱ्यातील म्हशींचे ६ अवैध गोठे हटविले

मनपा पथकाची कारवाई, भंगारचे दुकानही जमीनदोस्त
Sambhajinagar News
Sambhajinagar News : बेगमपुऱ्यातील म्हशींचे ६ अवैध गोठे हटविलेfile photo
Published on
Updated on

6 Illegal Buffalo Sheds in Begumpura Removed

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा बेगमपुऱ्यातील स्मशानभूमी आणि खाम नदीपात्रालगत असलेल्या महापालिकेच्या जागेवर अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून म्हशीचे गोठे आणि भंगाराचे गोदाम उभारण्यात आले होते. याबाबत महापालिकेच्या पथकाला माहिती मिळताच गुरुवारी येथील ६ गोठे आणि एक गोदामचे अतिक्रमण काढलण्यात आले.

Sambhajinagar News
नाथषष्ठी सोहळ्यानिमित्त वैष्णवांचा मेळा

नारेगावातील अतिक्रमणांवर हातोडा मारल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि. १४) महापालिका अतिक्रमण विभागाने बेगमपुर्यात धडक मोहीम राबविली. या भागात वर्षानुवर्षांपासून म्हशींचे अवैध गोठे आहेत. यातील काही गोठे हे महापालिकेच्या जागेत अतिक्रमण करून उभारण्यात आले आहेत.

महापालिकेकडे याबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने गुरुवारी पथकाने हे अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला. महापालिकेच्या स्मशानभूमीलगत खामनदीच्या शेजारीच हे अतिक्रमण असून यात तब्बल ६ गोठे उभारण्यात आले आहेत. त्यासोबतच गोठ्याच्या बाजूला एक भंगारचे दुकानही थाटण्यात आले आहे.

Sambhajinagar News
jalna news : नळविहिरा परिसरात माकडांचा उच्छाद

दरम्यान, मनपा आयुक्त अमोल येडगे, अतिक्रमण विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या आदेशाने उपायुक्त सविता सोनवणे, झोन क्र. १ च्या लता पुजारी, संजय सुरडकर, बेगमपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक नरेंद्र पापळकर, इमारत निरीक्षक मुकेश खडसे, रवींद्र देसाई, सागर श्रेष्ठ आदींच्या पथकाने ही कारवाई केली. महापालिकेच्या एक एकर जागेत हे अतिक्रमण करण्यात आले होते. पत्र्याचे शेड उभारून गोठे बांधले होते. तसेच आसपास दोन-तीन मातीची घरेही बांधली होती. हे सर्व अतिक्रमण काढून जागा मोकळी करून घेतली, अशी माहिती उपायुक्त सोनवणे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news