Unauthorized Water Connection : नागसेन कॉलनीत ३३ अनधिकृत नळ जोडण्या खंडित; नागरिकांत धास्ती

२०० मिमी मुख्य जलवाहिनीवरून सुरू होता पाणी उपसा
Unauthorized Water Connection
Unauthorized Water Connection : नागसेन कॉलनीत ३३ अनधिकृत नळ जोडण्या खंडित; नागरिकांत धास्तीfile photo
Published on: 
Updated on: 

33 unauthorized water connections disconnected in Nagsen Colony; Fear among citizens

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासह पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी महापालिकेने अनधिकृत नळ जोडण्यांविरोधात मोहीम तीव्र केली आहे. आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार विशेष शोध पथकाने मंगळवारी (दि.६) नागसेन कॉलनी, रोशन गेट व आसिफिया कॉलनी परिसरात धडक कारवाई करून तब्बल ३३ अनधिकृत नळ जोडण्या खंडित केल्या.

Unauthorized Water Connection
Navratri festival : शहराचे आराध्य दैवत कर्णपुरा येथील तुळजाभवानी मंदिर नवरात्रोत्सवासाठी सज्ज

महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार पाणीपुरवठा विभागाकडून शहरातील अनधिकृत नळ जोडण्यांविरोधात जोरदार मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार मंगळवारी नागसेन कॉलनी व रोशन गेटच्या मागील बाजूस असलेल्या आसिफिया कॉलनी परिसरात २०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरून अनधिकृतपणे पाणीउपसा केला जात असल्याचे पथकाला दिसून आले.

त्यानंतर पथकाने याभागातील सर्व ३३ जोडण्या तातडीने तोडण्यात आल्या. दरम्यान, या जोडण्यांमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावर वाहून जात होते. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होण्यासह नागरिकांची गैरसोय होत होती.

Unauthorized Water Connection
Sambhajinagar News : गुंठेवारीसाठी आता शेवटची संधी, ३१ ऑक्टोबरनंतर कारवाई

अतिरिक्त आयुक्त-२ कल्पिता पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कारवाईत कार्यकारी अभियंता दत्तात्रय गायकवाड, उपअभियंता मिलिंद भामरे, उपअभियंता आनंद राजपूत, कनिष्ठ अभियंता सचिन वेलदोडे, अक्षय डुकले, यांच्यासह नागरी सहाय्यक पथकाचे स्वर्णसिंग परदेशी, देविदास सुसर, जनार्दन सांगळे, बालाजी साबळे व भोसले यांनीही कारवाईत सहकार्य केले. पिण्याच्या पाण्याचा अपव्यय आणि अनधिकृत नळ जोडण्या खपवून घेतल्या जाणार नसून, शहरभर शोधमोहीम अधिक तीव्र केली जाणार असल्याचा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news