Sambhajinagar News : ऑरिक-बिडकीनमध्ये ३० तर शेंद्रात ११ भूखंडाचे होणार वाटप

उद्योग उभारणीची संधी, ४ सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज
Sambhajinagar News
Sambhajinagar News : ऑरिक-बिडकीनमध्ये ३० तर शेंद्रात ११ भूखंडाचे होणार वाटपfile photo
Published on
Updated on

30 plots will be allotted in Auric-Bidkeen and 11 in Sendra

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा ऑरिकच्या शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्रात जागेअभावी अनेक उद्योग वेटींगवर असताना आता भूखंड मिळविण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. बिडकीनमधील ३०, तर शेंद्रातील ११ भूखंडांचा ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. या भूखंडासाठी ४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.

Sambhajinagar News
Chikalthana Airport : चिकलठाणा विमानतळाच्या खासगीकरणाला तत्वत: मंजूरी

या भूखंडांमध्ये बिडकीन येथील ११ इंडस्ट्रियल एमएसएमई, दोन एमएसएमई (एससी-एसटी आरक्षण), सहा फूड पार्क, चार व्यावसायिक आणि चार निवासी भूखंड आहेत. याशिवाय बिझनेस हॉटेल, उच्च माध्यमिक शाळा आणि फ्युएल स्टेशन-कम-वर्कशॉपसाठी प्रत्येकी एक भूखंड ठेवण्यात आला आहे. एमएसएमईसाठी उपलब्ध भूखंडांचे क्षेत्रफळ साधारण १,२९६ ते २,७२४ चौरस मीटर आहे.

Sambhajinagar News
ST Bus Service : राखी पोर्णिमेनिमित्त एसटीच्या सेवेला प्राधान्य; कोटीचे उत्पन्न

फूड पार्कमधील भूखंडांचे क्षेत्रफळ ४,५०० चौरस मीटरपासून तब्बल ३५ हजार चौरस मीटरपेक्षा अधिक आहे. त्यामुळे छोट्या उद्योगांसोबतच अन्नप्रक्रिया क्षेत्रातील मोठ्या प्रकल्पांनाही येथे जागा मिळण्याची शक्यता आहे. शेंद्रामध्ये दोन व्यावसायिक, सहा निवासी तसेच रुग्णालय-अमेनिटी आणि कम्युनिटी शॉपिंग-अमेनिटीसाठी भूखंड उपलब्ध आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राबरोबरच निवासी, व्यावसायिक आणि सेवा सुविधांचा विस्तार करण्यावरही भर असल्याचे स्पष्ट होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news