

22 thousand properties did not pay tax of Rs 50 crores
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील शेकडो मालमत्ताधारकांनी वर्षानुवर्षांपासून कर थकविला आहे. त्यात २०२२ साली शोधण्यात आलेल्या नव्या २२ हजार मालमत्ताधारकांनीही कराचा भरणा केलेला नाही. त्यामुळे या मालमत्तांकडे आता ५० कोटी रुपयांचा कर थकला असून, शास्ती से आझादी या कर सवलतीच्या मोहिमेनंतर १७सप्टेंबरपासून महापालिका या थकबाकीदारांकडे वसुलीचा मोर्चा वळविणार आहे, अशी माहिती गुरुवारी (दि. २१) करमूल्य निर्धारक व संकलक विभागाचे उपायुक्त विकास नवाळे यांनी दिली.
महापालिकेची मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची सुमारे ८५० कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी पावले हजार मालमत्ताधारकांनी ८६ कोटींचा कर भरला. मालमत्ताधारकांच्या या प्रतिसादामुळे प्रशासकांनी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली.
दरम्यान, वर्षानुवर्षापासून कराचा भरणा न करणाऱ्या शेकडो मालमत्ताधारकांनी या सवलतीमध्येही कर भरणा केलेला नाही. त्यासोबतच २०२२ साली महापालिकेने कर आकारणी न केलेल्या ज्या २२ हजार मालमत्ता शोधल्या होत्या. त्या मालमत्ताधारकांनी कर आकारणी करून घेतली. मात्र अद्याप थकीत कराचा एक रुपयाही भरणा केलेला नाही.
त्यांच्याकडे सध्या ५० कोटी रुपयांचा कर थकला असून, शास्तीवरील सवलत मोहिमेनंतर या थकबाकीदारांकडे लक्ष केंद्रित करणार आहे. कर आकारणीमुळे मालमत्ताधारकांचे मोवाईल नंबर महापालिकेला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे या मालमत्ताध-ारकांशी संपर्क साधून कर भरण्याचे आवाहन करणार असल्याचे उपायुक्त विकास नवाळे यांनी सांगितले.
५०० थकबाकीदारांची यादी तयार
शहरातील प्रतिष्ठित आणि उच्चभू वसाहतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या विविध संस्था आहेत. या संस्थांकडे कोट्यवधी रुपयांचा TAX मालमत्ता कर थकला असून, या वसुलीसाठी प्रत्येक झोन कार्यालयाकडून ५० मालमत्ताधारकांची यादी मागविली आहे. यात १० झोनकडून ५०० मालमत्ताध-ारकांची यादी प्राप्त झाली आहे. आता यादीनुसार वसुलीची कार्यवाही होणार असल्याचे उपायुक्त विकास नवाळे यांनी सांगितले.