Sambhajinagar Car Accident : मंदिरात १५ वर्षे अखंड सेवा; शेवाळेंचा पायरीवर दुर्दैवी अंत

आरतीनंतर घेतलेला टपरीवरील चहा ठरला शेवटचा
Sambhajinagar News
Sambhajinagar News : मंदिरात १५ वर्षे अखंड सेवा; शेवाळेंचा पायरीवर दुर्दैवी अंतFile Photo
Published on
Updated on

15 years of continuous service in the temple; Shewale's unfortunate end on the temple steps

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : भरधाव कारचालकाने सिडको एन-१ भागातील काळा गणपती मंदिरासमोर सहा जणांना चिरडले. या घटनेत मंदिराचे सेवेकरी गुणाजी लक्ष्मण शेवाळे (६५, रा. रामनगर, विठ्ठलनगर) यांचा जागीच मृत्यू झाला. ते १५ वर्षांपासून मंदिरात साफसफाईचे काम करत होते. शेवाळे यांच्या अखंड सेवेचा मंदिराच्या पायरीवर दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली होती.

Sambhajinagar News
छ.संभाजीनगर : काळा गणपती मंदिरासमोर कारने पाच जणांना चिरडले ; 2 ठार, 4 जखमी

नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनगर भागात राहणारे गुणाजी शेवाळे हे गेल्या १५ वर्षांपासून काळा गणपती मंदिर येथे सफाई कर्मचारी म्हणून काम करत. दररोज सकाळी सात वाजता ते पत्नीसह रिक्षाने मंदिरात जायचे. पत्नीही मंदिरासमोर फुल, दुर्वा विक्रीचे काम करते. त्यांना दोन विवाहित मुले असून, मोठा मुलगाही फुलविक्रेता आहे. तर लहान मुलाचे चार महिन्यांपूर्वीच आजारपणात निधन झाले. या धक्क्यातून शेवाळे कुटुंबीय थोडेसे सावरले होते. नित्यनियमाने मंदिर उघडण्याचे काम शेवाळे हेच करत होते. मंदिर उघडल्यानंतर साफसफाई करायचे.

शुक्रवारी (दि.४) सकाळी नेहमीप्रमाणे साफसफाईनंतर मंदिरात आरती संपन्न झाली. त्यानंतर शेवाळे हे त्यांचे सहकारी रवींद्र भगवंतराव चौबे (६५) आणि श्रीकांत प्रभाकर राडेकर (६०) यांच्यासोबत साकोळकर हॉस्पिटलसमोर असलेल्या टपरीवर चहा पिण्यासाठी गेले. तिथे दररोज भेटणाऱ्या सर्वांशी त्यांनी गप्पा मारल्या.

Sambhajinagar News
High Security Number Plate : नोंदणी एका क्रमांकासाठी, मिळाला दुसराच क्रमांक

चहा घेतल्यानंतर तिघेही रस्ता ओलांडून मंदिराकडे जात असतानाच पिरॅमिड चौकाकडून भरधाव आलेल्या प्रशांत मगरच्या कारने चिरडत शेवाळे यांचा बळी घेतला. तर शेवाळेसोबतचे सहकारी रवींद्र चौबे, श्रीकांत राडेकर यांच्यासह दर्शनासाठी आलेले मनीषा व विकास संमदानी दाम्पत्य तसेच दिगंबर तौर अशा पाच जणांना धडक देऊन गंभीर जखमी केले. घटना समजताच नागरिकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती.

नव्या कारचा अनुभव ठरला प्राणघातक

आरोपी प्रशांत एकनाथ मगर (३०, रा. सिडको) हा शिक्षक असून, उस्मानपुऱ्यात त्याचा क्लास आहे. त्याने २२ मे रोजी नवीन स्विफ्ट डिझायर अॅटोमॅटिक कार खरेदी केली होती. सकाळी गारखेडा येथील विभागीय क्रीडा संकुलात टेनिस खेळून घराकडे परतत होता.

पिरॅमिड चौकातून सर्व्हिस रोडने जाताना साकोळकर हॉस्पिटलजवळ एका वाहनाची हल बसली. त्याचवेळी त्याचे कारवरील नियंत्रण सुटेल. समोरून अचानक आलेल्या कारकडे त्याचे लक्ष गेले. तेव्हा ब्रेक ऐवजी अॅक्सिलेटर दाबल्याने कारने वेग पकडला. मंदिराजवळ असलेल्या पादचाऱ्यांना उडवत थेट मंदिराच्या पायऱ्यांवर आदळली. कारचालक प्रशांत मगर याला अटक करून सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला असून, त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news