Car Accident : स्कार्पिओ पलटल्याने १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

लग्नासाठी मामाच्या गावी आला होता
Sambhajinagar Car Accident
स्कार्पिओ पलटल्याने १५ वर्षीय मुलाचा मृत्यूfile photo
Published on
Updated on

15-Year-Old Boy Dies After Scorpio Overturns

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : चुलत मावशीच्या लग्नासाठी मामाच्या गावी आलेल्या एका १५ वर्षीय मुलावर घाला गाडीवरील काळाने घातला. फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या स्कार्पिओ नियंत्रण सुटून गाडीने तीन ते चार पलट्या खाल्ल्या. या भीषण अपघातात मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी (दि. ९) दुपारी ३ वाजेच्या सुमारास टाकळी वैद्य शिवारात घडली. अभिषेक उद्धव काकडे (१५, रा. वडखा, ता. छत्रपती संभाजीनगर) असे मृताचे नाव आहे.

Sambhajinagar Car Accident
Paithan Accident | अवैध वाळू वाहतुकीच्या हायवाने घेतला शिवसैनिकाचा बळी: संतप्त नातेवाईकांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक हा शहरात पॉलिटेक्निकचे शिक्षण घेत होता. टाकळी वैद्य येथे त्याच्या चुलत मावशीचा विवाह सो हळा आयोजित करण्यात आला होता. याच लग्नासाठी तो दोन दिवसांपूर्वी मोठ्या उत्साहाने मामाच्या गावी आला होता. शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अभिषेक त्याचे तीन मित्र आणि मामासोबत स्कार्पिओ गाडीतून टाकळी वैद्य परिसरात फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडला.

मात्र, वाटेत अचानक गाडीवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव स्कार्पिओने रस्त्यावर तीन-चार पलट्या खाल्ल्या. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचा चक्काचूर झाला. यामध्ये अभिषेकच्या डोक्याला जबर मार लागला, तर गाडीतील इतर जण सुदैवाने किरकोळ जखमी झाले.

Sambhajinagar Car Accident
Car Accident : भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अभिषेकला तातडीने उपचारासाठी घाटीत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या अपघातप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास अंमलदार सुधाकर बोचरे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news