

12th Grade Results: 97.69%
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी (दि.२) लागला. यात तालुक्याचा निकाल ९७.६९ टक्के लागला. निकालात मुलांपेक्षा मुलीच पुन्हा एकदा वरचढ ठरल्या असून, तालुक्यातील २१ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे.
बारावी परीक्षेसाठी तालुक्यातून एकूण ६ हजार १९७विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६ हजार १६७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात ३ हजार ५०२ मुले तर २ हजार ६६५ मुलींचा समावेश होता. यात ६ हजार २५ विद्याथी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये ३ हजार ४०८ मुले तर २ हजार ६१७ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. निकालाच्या टक्केवारीत मुलांच्या निकालाची टक्केवारी ९७. ३१ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९८. १९ आहे. बारावीच्या निकालात तालुक्यातील २१ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल हा शंभर टक्के लागला.
तालुक्याची निकाल परंपरा कायम
उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत यंदाही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामागे विद्याथी, शिक्षक व पालक यांचे संयुक्त परिश्रम मोलाचे असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातून व्यक्त केले जात आहे.