Sambhajinagar News : सेवानिवृत कर्मचाऱ्यांच्या थकीत ८० कोटींपैकी ११ कोटींची देणी अदा

दिलासा : उर्वरित रक्कम ज्येष्ठतेनुसार टप्प्याटप्प्याने मिळणार
Sambhajinagar News
Sambhajinagar News : सेवानिवृत कर्मचाऱ्यांच्या थकीत ८० कोटींपैकी ११ कोटींची देणी अदाfile photo
Published on
Updated on

₹11 crore paid out of ₹80 crore in outstanding dues owed to retired employees

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सेवानिवृत्तीनंतरच्या हक्काच्या रकमेपासून वंचित राहिलेल्या महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाला अखेर काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे . सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत देणीचा प्रश्न दैनिक पुढारीने २७ सप्टेंबर २०२५ रोजी ३० सेवानिवृत्तांच्या मृत्यूनंतरही मनपाला फुटेना पाझर या वृत्तातून मांडला होता. त्यानंतर प्रशासनाने प्रलंबित देणी अदा करण्यास सुरुवात केली असून, आतापर्यंत सुमारे ११ कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. तर उर्वरित रक्कम ज्येष्ठतेनुसार टप्प्याटप्प्याने दिली जाणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : खवड्या डोंगरावरील चांदगुडे कुटुंबाच्या दुर्दैवी अंतामागे कौटुंबिक कलह ?

३० सेवानिवृत्तांच्या मृत्यूनंतरही मनपाला फुटेना पाझर या वृत्तातून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत देणीचा प्रश्न दैनिक पुढारीने २७ सप्टेंबर २०२५ रोजीच्या अंकात मांडला होता. त्यावेळी महापालिकेतील २५० हून अधिक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनासह जीपीएफ, ग्रॅच्युटी आणि अन्य लाभांची सुमारे ४५ कोटी रुपयांची देणी प्रलंबित असल्याचे समोर आले होते. अनेक वर्षे कार्यालयाच्या खेट्या मारूनही हक्काची रक्कम मिळत नसल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती.

आता या थकीत देणीचा आकडा वाढून सुमारे ८० कोटी रुपयांवर पोहोचला असला, तरी त्यापैकी ११ कोटी रुपये अदा करण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेत बदल झाल्याचे दिसून येत आहे. महापालिकेत दरमहा सरासरी १० ते १२ कर्मचारी सेवानिवृत्त होतात. त्यांना अंश उपदान, रजा रोखीकरण, ग्रॅच्युटी आणि अन्य सेवानिवृत्ती लाभांची रक्कम देय असते. मात्र, महापालिकेच्या आर्थिक अडचणी आणि अत्यल्प वसुलीमुळे या देणीचा मोठा अनुशेष निर्माण झाला आहे.

Sambhajinagar News
Gambling Case : 'हॉटेल लकी स्टार'वर पोलिसांचा छापा; २९ जुगाऱ्यांना बेड्या

दरम्यान, प्रशासनाने आतापर्यंत अदा केलेल्या ११ कोटी रुपयांत ज्येष्ठतेनुसार तसेच अत्यंत महत्त्वाची आर्थिक अडचण असलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले आहे. २०२३ आणि २०२४ मधील शेवटचे दोन महिने वगळता प्रलंबित देणी अदा करण्यात आली आहेत. दैनिक पुढारीने मांडलेल्या प्रश्नाची महापालिका प्रशासनाने दखल घेत सेवानिवृत्तांच्या हक्काची रक्कम देण्यास सुरुवात केल्याने अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news