Gambling Case : 'हॉटेल लकी स्टार'वर पोलिसांचा छापा; २९ जुगाऱ्यांना बेड्या

पोलिस आयुक्तांच्या आदेशाने 'पास २०' पथकाची कारवाई
illegal gambling
illegal gamblingFile Photo
Published on
Updated on

Police raid 'Hotel Lucky Star'; 29 gamblers arrested

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा पोलिस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मिल कॉर्नर येथील 'लकी स्टार' हॉटेलमध्ये पुन्हा सुरु झालेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी शनिवारी (दि. २२) रात्री उशिरा छापा मारला. या कारवाईत 'झन्नामन्ना' नावाचा जुगार खेळणाऱ्या २९ जणांच्या मुसक्या आवळल्या. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या आदेशाने पास २० पथकाने ही कारवाई केली. छाप्यात रोख रक्कम व मोबाईलसह ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.

illegal gambling
Sambhajinagar News : खवड्या डोंगरावरील चांदगुडे कुटुंबाच्या दुर्दैवी अंतामागे कौटुंबिक कलह ?

अधिक माहितीनुसार, पोलिस आयुक्त प्रविण पवार यांना मिल कॉर्नर येथील 'हॉटेल लकी स्टार' मध्ये जुगार सुरु असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची खात्री होताच आयुक्तांनी थेट पोलिस कल्याण विभागाच्या पोलिस निरीक्षक नीतू तायडे आणि गुन्हे शाखेच्या 'पास २०' पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, पथकाने शनिवारी रात्री ९.४० वाजेच्या सुमारास या हॉटेलवर छापा टाकला.

त्यावेळी आरोपी पैशांवर 'झन्नामन्ना' नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले. कारवाईदरम्यान सिटी चौक पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक निर्मला परदेशी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व आरोपींना ताब्यात घेत जप्ती पंचनामा करण्यात आला.

illegal gambling
Maratha Reservation : दाते-पाटील पंधराव्या दिवशीही उपोषणावर ठाम

या प्रकरणी सिटी चौक ठाण्याचे उपनिरीक्षक प्रमोद कोळेकर यांच्या फिर्यादीवरून २९ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक भागवत मुठाळ करत आहेत. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रविण पवार, उपायुक्त (गुन्हे) शशिकांत सातव, सहायक आयुक्त (शहर) सागर देशमुख, गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नीतू तायडे, निर्मला परदेशी, गुन्हे शाखा पास २० चे उपनिरीक्षक दिनेश बन, अंमलदार थोरात, गोबाडे, डाखुरे, आवारे, राऊत, साबळे, जाधव, शेख, शेंडे, नाटकर, कराडकर, पठाण, मपोअं. माळी, इंगळे, भोसले तसेच सिटी चौक पोलिसांच्या पथकाने पार पाडली.

या २९ जुगारींना ठोकल्या बेड्या

प्रताप चव्हाण (रा. जाफराबाद), बालमुकुंद जस्वाल (रा. लासूर स्टेशन), सिड्डू खान पठाण (रा. कन्नड), शेख हमीद (रा. भडकल गेट), शरीफ कुरेशी (रा. गेवराई तांडा), मजार खान (रा. नारेगाव), हुमेश कुरेशी (रा. सिल्लेखाना), कैलास चोरमाळे (रा. जालना), घनशाम भुरेवाल (रा. जालना), शेख युनुस (रा. नारेगाव), आतिक पठाण (रा. पडेगाव), शेख नईम (रा. नारेगाव), सुरेश जगताप (रा. जयभीमनगर), अनिल टेकाळे (रा. बदनापूर), शेख रजित (रा. किराडपुरा), शेख अन्वर (रा. बारी कॉलनी), शेख मतीन (रा. कटकट गेट),

संदीप बिरुटे (रा. गंगापूर), लखन कुसे (रा. बेगमपुरा), शेख शमशुद्दीन (रा. सादातनगर), आतिष इंगळे (रा. भावसिंगपुरा), फिरोज खान (रा. बेगमपुरा), रामदास दांडगे (रा. पदमपुरा), मनोज कंदे (रा. नारळीबाग), समाधान नवल (रा. भावसिंगपुरा), महिंद्रा कांबळे (रा. पुसद), मोहसिन खान (रा. भडकल गेट), अक्रम खान (रा. बेगमपुरा) आणि अशक अली उर्फ बब्बु जिलानी सय्यद (रा. छावणी) या २९ जणांना अटक केली आहे.

गतवर्षी पकडले होते १०० जुगारी

हे हॉटेल एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संबंधित आहे. गतवर्षी जुलैमध्ये याच हॉटेलवर सिटी चौक पोलिसांनी छापा मारला होता. त्यावेळी चारही मजल्यावर तब्बल १०० जुगारींना पकडण्यात आले होते. त्यापूर्वीही पोलिसांनी कारवाई केलेली आहे. मात्र, वारंवार याच हॉटेलमध्ये बिनबोभाटपणे जुगार अड्डा चालविला जात असल्याचे कारवाईवरून स्पष्ट होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news