cat bites : कुत्र्यांचाच नव्हे वाघाच्या मावशीचाही उच्छाद

घाटीत नऊ महिन्यात श्वानदंशाचे १०,६३३, तर मांजरी चावा घेतलेले १,८३३ रुग्ण
cat bites
cat bites : कुत्र्यांचाच नव्हे वाघाच्या मावशीचाही उच्छादfile photo
Published on: 
Updated on: 

10,633 cases of dog bites and 1,833 cases of cat bites in the Ghati in nine months

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनली असताना 'वाघाची मावशी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांजरांचाही धोका वाढला आहे. घाटी रुग्णालयात जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत कुत्र्यांनी हल्ला केलेले तब्बल १० हजार ६३३ रुग्ण आले. तर मांजरीने चावा घेतलेलेही १ हजार ८३३ रुग्ण उपचार करुन गेले.

cat bites
Sanjay Shirsat : ठाकरे बंधूंचा मोर्चा म्हणजे पब्लिसिटी स्टंट

घाटी रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १० कुत्रा, मांजरसह इतर प्राणी चावलेल्या रुग्णांवर उपचार केले जातात. शहरात दरमहा सरासरी १२०० हून अधिक नागरिक श्वानदंशाचे शिकार होत आहेत. कुत्रे पाठोपाठ आता वाघांची मावशी म्हणून ओळखली जाणारी मांजरही या स्पर्धेत आघाडीवर आहे.

जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान १८३३ जणांना मांजरीने चावा घेतला असून, जून आणि ऑगस्ट महिन्यात ही संख्या तब्बल दोनशेच्या पार गेली आहे. यामुळे शहरात भितीचे वातावरण असल्याने महापालिकेने भटक्या कुत्र्यांची नसबंदी आणि मांजरांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना राबवावी, अशी मागणी केली जात आहे.

cat bites
Sambhajinagar News : सातारा-देवळाईत पाण्यासाठी ४०० नागरिकांचा जलकुंभावर ठिय्या

घाटीत १० हजार अँटी रेबीज इंजेक्शन उपलब्ध

प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी रुग्णालयात १० हजार अँटी रेबीज (एआरव्ही) डोस उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे दररोज उपचारासाठी येणाऱ्या ३५ ते ४० रुग्णांना वेळेत आणि मोफत उपचार मिळणे शक्य झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news