Sambhajinagar News : सातारा-देवळाईत पाण्यासाठी ४०० नागरिकांचा जलकुंभावर ठिय्या

दाराशी जलवाहिनी तरी घागर रिकामीच; पाणी सुरू न केल्यास रास्ता रोकोचा इशारा
Sambhajinagar News
Sambhajinagar News : सातारा-देवळाईत पाण्यासाठी ४०० नागरिकांचा जलकुंभावर ठिय्याfile photo
Published on: 
Updated on: 

400 residents protest for water in Satara-Deolai

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेत समावेश होऊन तब्बल दहा वर्षे उलटली, गुंठेवारी आणि मालमत्ता कर नियमित भरूनही सातारा-देवळाई परिसरातील नागरिकांची पाण्यासाठीची वणवण थांबलेली नाही. नवीन पाणी योजनेतून दाराशी जलवाहिनी आली, पण नळजोडणी न झाल्याने पाणी मिळत नसल्याच्या संतापातून रविवारी (दि. ४) हरिओम नगर येथील जलकुंभावर ३०० ते ४०० महिला-पुरुषांनी तीन तास ठिय्या आंदोलन केले. 'पाणी आमच्या हक्काचे', 'पाणी द्या, नसता खुर्ची खाली करा' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

Sambhajinagar News
Skill Hub : छत्रपती संभाजीनगर बनणार 'स्किल हब', आयटीआयसाठी २३८ कोटीची गुंतवणूक

सातारा-देवळाईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम संथ गतीने सुरू आहे. चार जलकुंभांचे काम पूर्ण होऊन अंतर्गत जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. मात्र, घराघरांत नळजोडणी न केल्याने नागरिकांना पाण्याचा थेंबही मिळालेला नाही. यंदा पाऊस कमी झाल्याने परिसरातील विहिरी आणि विंधनविहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पिण्यासाठी व वापरासाठी महागड्या खासगी टँकरवर आणि २५ रुपये प्रति जारच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. विशेष म्हणजे, सलग तीन तास ठिय्या आंदोलन सुरू असतानाही महापालिका, मजीप्रा किंवा कंत्राटदार कंपनीचा एकही अधिकारी या ठिकाणी फिरकला नाही.

या पाणीटंचाईवरून प्रभागातील चारही नगरसेवकांविरुद्ध नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. महापालिकेत पाणीप्रश्नावर आवाज उठवण्यात हे लोकप्रतिनिधी अपयशी ठरले असून, नागरिकांना टँकर मिळत नसताना नगरसेवकांच्या घरी मात्र टँकर पोहोचत असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला.

Sambhajinagar News
Sanjay Shirsat : ठाकरे बंधूंचा मोर्चा म्हणजे पब्लिसिटी स्टंट

प्रशासनाने तातडीने नळजोडणी करून योजनेचे पाणी सुरू करावे किंवा महापालिकेकडून अल्पदरात टँकर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या प्रश्नाकडे तातडीने लक्ष न दिल्यास देवळाई चौकात रास्ता रोको करण्याचा सज्जड इशारा संतप्त नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news