Sambhajinagar News : ऑरिकसाठी दोन महिन्यांत १० हजार एकर भूसंपादन प्रक्रिया

केंद्रीय उद्योग सचिव भाटिया यांची माहिती अनेक उद्योगांना जागेची प्रतीक्षा
Sambhajinagar News
Sambhajinagar News : ऑरिकसाठी दोन महिन्यांत १० हजार एकर भूसंपादन प्रक्रियाFile Photo
Published on
Updated on

10 thousand acres land acquisition process for Auric in two months

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : ऑरिकच्या शेंद्रा व बिडकीन औद्योगिक वसाहतीमध्ये टोयोटो-किर्लोस्कर, अथर, जेएसडब्ल्यूसह अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय उद्योगांनी जमीन संपादित केली आहे. त्यामुळे येथील लैंड बैंक आटल्याने भविष्यातील उद्योग विस्ताराच्या दृष्टीने बिडकीन लगत १० हजार एकर भूसंपादनचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या दोन महिन्यांत नोटीससह भूसंपादन प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती केंद्रीय उद्योग सचिव अमरदीप भाटिया यांनी शनिवारी (दि.१२) पत्रकार परिषदेत दिली.

Sambhajinagar News
Chhatrapati Sambhajinagar Crime : पिस्टल कसे चालते दाखव म्हणताच सुटली गोळी

दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी) च्या ऑरिक शेंद्रा व बिडकीनला शनिवारी भेट देत उद्योग सचिव भाटिया यांनी पाहणी केली. तसेच उद्योग संघटना तसेच उद्य-ोजकांसमवेत बैठका घेऊन स्थानिक उद्योगविस्ताराचा आढावा आणि माहिती घेतली. विकसित भारत २०४७ अंतर्गत औद्योगिक कॉरिडॉर्स विकसित भारताच्या आर्थिक दृष्टिकोनासाठी प्रेरक घटक या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी राज्याच्या उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अनबलगन, ऑरिकचे व्यवस्थापकीय संचालक पी. डी. मलिकनेर आदींची उपस्थिती होती. भाटिया म्हणाले, ऑरिक शेंद्रानंतर बिडकीन टप्प्यातील जमीन उद्योगांनी मोठ्या प्रमाणावर संपादित केली आहे. नव्याने येऊ पाहणाऱ्या उद्योगांसाठी जमीन देण्याविषयी आम्ही निर्णय घेतला आहे.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : दोन डॉक्टरांनी भांडणात केसपेपरच टर्राटर्रा फाडला

जेणेकरून येथील उद्योगांचे जाळे अधिक मजबूत होईल. बिडकीन जवळ आणखी १० हजार एकर जमीन संपादित करण्याचे नियोजन करत आहोत. पुढील दोन महिन्यांत जागा संपादन करण्याबाबत नोटीस देणे, पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेसाठी एजन्सीचा शोध तसेच अन्य प्रक्रिया या कालावधीत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. असेही त्यांनी नमूद केले.

स्टार्टअप्सना एनए लागणार नाही

दहा हजार एकर जागेबाबतही चाचपणी करण्याविषयी आम्ही सूचित केले आहे. कृषीपूरक स्टार्टअप्सना एनएची अडचण येत असल्याचे चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्रीकल्चर (सीएमआयए) व मंजिक भेटीदरम्यान झालेल्या बैठकीत सांगण्यात आले. मात्र अशा स्टार्टअप्सना एनए लागणार नाही. अडचण असल्यास आमच्याकडे मेल पाठवा, अडचण सोडविली जाईल, असे भाटिया यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news