परभणी: ताडकळस बाजार समिती निवडणुकीत भाजपचा ९ जागांवर विजय

परभणी: ताडकळस बाजार समिती निवडणुकीत भाजपचा ९ जागांवर विजय
Published on
Updated on

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कोणत्याही एका पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. तर भाजप प्रणित पॅनलने सर्वाधिक ९ जागा जिंकल्या आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान झाले. आज (दि. २९) पूर्णा तहसील कार्यालयात मतमोजणी झाली.

या निवडणुकीत भाजप प्रणित पॅनलने सर्वाधिक ९ जागा पटकावल्या आहेत. तर काँग्रेस प्रणित पॅनलने ६ तर राष्ट्रवादी पॅनलने ३ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे बाजार समितीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही.

या निवडणुकीतील विजय उमेदवार पुढीलप्रमाणे

पंडित बळीराम जाधव, अंकुश ज्ञानदेव जोगदंड, बाळासाहेब भाऊसाहेब पवार, रंगनाथ रामराव भोसले, बालाजी चंद्रकांत रुद्रवार, अजित अनिल वरपूडकर, नवनाथ रामकिसन शिंदे, रेखा अंकुश आवरगंड, भागुबाई नामदेव पौळ, देवानंद गणपती नावकीकर, सुरेश राजाभाऊ गिरी, गजानन गणेशराव अंभोरे, अंकुश संभाजीराव शिंदे, विश्वनाथ वावळे, रामेश्वर गंगाधर हिंगे, नंदकिशोर मोहनलाल मुंदडा, नरहरी शंकरराव रुद्रवार, बापूराव तुकाराम अंभोरे यांचा समावेश आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news