Youth Drowns Parli | परळीजवळील चांदापूर तलावात युवक बुडाला; शोधमोहीम सुरू

पोहत असताना पाण्याच्या खोलीचा अचूक अंदाज न आल्याने तरूण बुडाला
Youth Drowns In Beed
सुमित कलशेट्टीPudhari
Published on
Updated on

Youth Drowns In Beed

परळी वैजनाथ : परळी शहरालगत असलेल्या चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा मंगळवारी (दि. 23 ) सकाळी पाण्यात बुडून बेपत्ता झाल्याची घटना घडली. सुमित कलशेट्टी (वय 37, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) असे संबंधित युवकाचे नाव आहे.

माहितीनुसार, सुमित कलशेट्टी हे सकाळच्या सुमारास चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना त्यांना पाण्याच्या खोलीचा अचूक अंदाज न आल्याने ते तलावाच्या खोल भागात गेल्याचे सांगितले जाते. त्यानंतर ते पाण्याबाहेर न आल्याने त्यांच्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Youth Drowns In Beed
Parli Liquor Protest | दारूच्या व्यसनामुळे युवकाचा मृत्यू; साठेनगरमध्ये दारूबंदीच्या मागणीसाठी नागरिकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. बेपत्ता युवकाचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर शोधमोहीम राबविण्यात येत असून बचाव पथकाकडून तलाव परिसरात शोधकार्य सुरू आहे. या घटनेमुळे परळी शहरासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news