जागतिक पुस्तक दिन : लोप पावली वाचन संस्कृती; तरूणाई रिल्सच्या आहारी

जागतिक पुस्तक दिन : लोप पावली वाचन संस्कृती; तरूणाई रिल्सच्या आहारी


तिमिराकडून तेजाकडे नेणारे ग्रंथ हेच गुरु आहेत. ग्रंथरुपी परिसाचा स्पर्श होताच आयुष्याचा सोनं होते. बालपणापासून ते अंतिम काळापर्यंत पुस्तक मानवाची खऱ्या मित्रांस साथ देतात. पुस्तके खरे निस्वार्थ मित्र आहेत. आयुष्यातील चढउतार समयी योग्य मार्गदर्शन करणारे निस्वार्थ, निरपेक्ष सल्ला देणारे निराशेच्या गर्तेतून ज्ञानरूपी मशाल दाखवून बाहेर काढणारे खरे मित्र भेगाळलेल्या वसुसम झालेल्या आयुष्याला पुन्हा जोडण्याचे कार्य पुस्तकातील ज्ञानरूपी पाऊस करतो. मेंदूत थेंबा थेंबाने मेंदूच्या मृत्तीकेस सुपीक करतो. मग त्यातून उपजत होते, ते चांगले वाणीचे अर्थात चांगल्या गुणाची योग्य संस्काराची मग गुणांचं अस्सल सोनं पिकतं.

बुद्धीची कार्यक्षमता वाढते चांगलं संस्कृत मनुष्य म्हणून जगण्याचा आयुष्यात खरं पथदर्शक असतात. ती पुस्तके पुस्तकाचे आक्षय शिदोरी शेवटपर्यंत माणसाच्या सोबत असते. पुस्तकातले ज्ञान कधीही संपत नाही. जगातील हीच एक संपत्ती अशी आहे, जी कधी नष्ट होऊ शकत नाही. आज (दि.२२)  जागतिक पुस्तक दिन जगभरामध्ये साजरा होतोय. परंतु, दिवसेंदिवस मोबाईलमुळे, टीव्हीमुळे तरुण पिढी पुस्तकाकडे न वळता मोबाईल, टीव्ही,इंटरनेट, इंस्टाग्रामकडे वळू लागली आहे. यामुळे पुस्तकाचे महत्व दिवसेंदिवस कमी होताना चित्र पाहायला मिळत आहे.

जाण पुस्तक भंडार
असे अक्षय संपत्ती
देती बोधात्मक ज्ञान
दूर करणे आपत्ती

अनेक थोर संतांनी १६ व्या शतकात समाज प्रबोधन केले. संत ज्ञानेश्वरांनी गीतेच पाकृत भाषेत भाषांतरित करून समाजास योग्य दिशा दिली. संत तुकाराम, नामदेव महाराज यांची संतवाणी अभंगवाणी, संत रामदासाचे मनाचे श्लोक, बहिणाबाई यांच्या ओवी मुखद्गत होत्या. त्यावेळी संत सज्जन समाजाचे गुरु होते. परंतु त्यांनी नश्वर देह त्याग करून आपले सर्व ज्ञान ग्रंथरूपी सामग्रीच्या स्वरूपात आपल्याला दान दिलेला आहे. आज आपल्यापर्यंत झिरपत झिरपत पुस्तकातून आलेला आहे. आजच्या परीला पौराणिक आधुनिक ज्ञान मिळते. ते पुस्तक गुरु नाही लाभले. तरी पुस्तकेच गुरु म्हणून आपल्याला आयुष्यभर मार्गदर्शन करतात. पुस्तकातून लेखन कौशल्य वकृत्व कला आत्मविश्वास, ज्ञान, अनुभव संस्कार जीवन जगण्याची कला सर्व काही शिकता येते.

पुस्तक आपले मनोरंजन करत करत बहुत प्रबोधन ज्ञान देतात. तर कधी आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन घालतात. अर्थात पुस्तक आपल्याला अंधारात तिमिराकडे अज्ञानातून ज्ञानाकडे नेतात. पुस्तक सारखा दुसरा गुरु नाही, हे सत्य असले तरी आजची पिढी ही पुस्तकापासून दुरावत झालेली आहे. पुस्तकात मनोरंजक तसेच वैचारिक ज्ञान भेटते. आजची पिढी ही केवळ मनोरंजनाचा वाटा शोधते. त्यामुळे ललित लेखन मनोरंजन कथाचे मनोकल्पित भाव विश्व त्यांना भावते. त्यासाठी ते त्याच प्रकारचे पुस्तक शोधतात. वाचण्याची भूक पुस्तकातून पूर्ण झाली नाही, तर ते इंटरनेट सारख्या माध्यमातून ओळखतात.

इंटरनेटवर एका क्लिकवर  त्यांना हवे ते प्राप्त होते. जगभरातील लेखकाचे पुस्तक आज इंटरनेटवर सहजपणे उपलब्ध होतात. त्यामुळे ग्रंथालयात पायपीट करावी लागत नाही. पुस्तक चाळण त्यातून योग्य पुस्तक निवडणे, हे उद्योग पुस्तक प्रेमी हल्ली करताना दिसत नाहीत. त्यामुळेच पुस्तक वाचकांची संख्या कमी झालेली दिसून येते.  जग कितीही आधुनिक झाले, तरी पुस्तक आणि वाचक यांच्यातील नातं मात्र कायम आहे. पुस्तक वाचण्याची माध्यम बदल ईबुक, डिजिटल बुक्स, लॅपटॉप, मोबाईल इत्यादी साधने सहज उपलब्ध होत आहेत. या डिजिटल क्रांतीमुळे खरंतर पुस्तक वाचन संस्कृती लोप पावत चाललेली आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाचे फायदे तितके आहेत. तितके तोटे आहेत. पुस्तक वास्तव असतात.

डोळ्याची मेंदूची विविध समस्या भेडसावत आहे.
ग्रंथ वाचन संस्कृती
लोप पावत चालली
मोबाईल, टीव्हीमुळे
मुले सारी बिघडली, असे
म्हणावे लागेल .

आमच्या काळात छोटी छोटी पुस्तके वाचायला मिळणे ही दुर्मिळ बाब होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, तुमच्या
खिशात जर दोन नाणी असेल. तर एका नाणीची तुम्ही भाकरी घ्या आणि दुसऱ्या नाणीचे पुस्तक घ्या.
वाचन केले पाहिजे. वाचनाने माणूस समृद्ध होतो .
– लेखक सुभाष सुतार

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news