Beed Crime News : गेवराईत महिलेवर गोळीबार, पोलिसांकडे नोंदच नाही; जखमी महिलेवर उपचार सुरू

गेवराईत अशी कुठलीच घटना झाली नसल्याचे, पोलोस निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांनी म्हटले आहे.
Beed Crime News
Beed Crime News : गेवराईत महिलेवर गोळीबार, पोलिसांकडे नोंदच नाही; जखमी महिलेवर उपचार सुरू File Photo
Published on
Updated on

Woman shot in Gevrai, no record police station

बीड, पुढारी वृत्तसेवा : महिलेवर गोळी झाडण्यात अली असून जखमी महिलेला जिल्हा रुग्णालयातून छत्रपती संभाजीनगरला हलविण्यात आले. शीतल कटमिल्ला पवार भोसले (वय २६) असे जखमी महिलेचे नाव आहे. जखमी शितलला दवाखान्यात आणणाऱ्या रुचिका भोसले या महिलेने गेवराईत गोळीबार झाल्याचे सांगितले. मात्र, गेवराईत अशी कुठलीच घटना झाली नसल्याचे, पोलोस निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांनी म्हटले आहे.

Beed Crime News
Beed News : चोरंबा पुलावर एसटी बसने कारला उडवले, एअर बॅग ओपन झाल्याने चार मुले वाचली

शनिवार रविवारच्या मध्यरात्री जखमी शीतल पवार भोसले हिला घेऊन रुचिका भोसले जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या. शहागड येथून खरेदी करण्यासाठी गेवराईत आल्यानंतर गोळीबार झाला असा दावा त्यांनी केला. दरम्यान, वैद्यकीय तपासणी (एक्स रे) मध्ये महिलेच्या उजव्या छातीत गोळी असल्याचे निदान झाले. त्यामुळे शीतल पवारला संभाजीनगरला रेफर करण्यात आल्याची नोंद जिल्हा रुग्णालयात आहे.

दरम्यान, गेवराई येथे कुठेही गोळीबार झाल्याची माहिती मिळाली नाही. तसेच उप जिल्हा रुग्णालय गेवराई येथे सुद्धा नोंद नाही. शितल व संदीप हे पती पत्नी असून ते खामगाव येथून सोबत गेले होते. शीतल ही शहागड येथे राहते तिची आई वडील हे खामगाव येथे राहतात.

Beed Crime News
Beed Accident : देवदर्शनाहून परतताना भाविकांवर काळाचा घाला; एक ठार,९ जखमी

सदर महिला हीचा जबाब घेणे करिता सहाय्यक पोलीस निरीक्षक लंके गेले असल्याचे प्रविणकुमार बांगर यांनी सांगितले. मला माझे पती तसेच माझी सवत आम्ही आमचे घरगुती भांडण मिटवीत असताना माझ्या सवतीच्या भावाने तसेच बहिणीने मारहाण केली असून त्यावेळी माझा पती देखील हजर होता. परंतु मला गोळी कोणी मारली,

सदर घटना ही कुठे घडली या बाबत काही एक सांगत नाही, असे महिलेने संगीतले असून दवाखान्यातून सुटी झाल्यानंतर जबाब देणार असल्याचे सांगितल्याचे म्हटले आहे.

नातेवाइकांचा घाटीत गोंधळ; जखमीला पोलिसांचे संरक्षण

बीडच्या गेवराई येथे गोळीबारात जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मात्र तिचे नातेवाईकही घाटीत पोहोचल्याने दोन्हीकडील नातेवाईक आमनेसामने येऊन एकच गोंधळ उडाला.

बेगमपुरा पोलिसांनी धाव घेत जमलेल्या जमावाला तेथून काढून दिले.

त्यानंतर जखमी महिलेच्या संरक्षणासाठी ५ पोलिस कर्मचारी तैनात केल्याची माहिती बेमगपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक मंगेश जगताप यांनी दिली.

दरम्यान, गेवराईचे पोलिस जखमी महिलेचा जबाब घेण्यासाठी आले असल्याचेही निरीक्षक जगताप यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news