Beed Accident | मेहकर-पंढरपूर पालखी महामार्गावरील अपघातातील गंभीर जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

Mehkar Pandharpur Highway | रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात
Beed Accident News
मेहकर-पंढरपूर पालखी महामार्गावर ट्रक व ॲटोच्या अपघात File Photo
Published on
Updated on

Woman Dies in Accident Mehkar Pandharpur Highway

माजलगाव : मेहकर-पंढरपूर या पालखी महामार्गावरील तेलगाव-माजलगाव रस्त्यावर रविवारी (दि.१) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. त्यात तीनजण जागीच ठार तर दोनजण गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, रात्री १ वाजता जखमी महिलेस माजलगाव शहरातील रूग्णालयात उपचार करून छत्रपती संभाजीनगर येथील रूग्णालयात दाखल केले होते. या महिलेची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. उपचारादरम्यान आज (दि.२) सकाळी आठ वाजता तिचा मृत्यू झाला. फरीदा अन्वर पठाण असे मृत महिलेचे नाव आहे.

मृत महिलेला ३ मुले असून १ मुलगा १ वर्षाचा आहे. तर या महिलेचे सासर सिरसाळा येथे आहे. तिथे तिचे पतीसोबत सतत भांडणे होत होती. त्यामुळे तिचे आई वडील सिरसाळा येथे गेले होते. रात्री उशिरा तिला घेऊन ते येत असताना हा अपघात झाला.

Beed Accident News
बीड मधील चौघांचे यूपीएससी परीक्षेत यश

अपघातातील जखमींना माजलगाव येथील संजीवणी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ पाठविण्यात आले. मृतांमध्ये पतीपत्नीचा समावेश आहे . हा अपघात एवढा भीषण होता की, आयशरने ॲटोला जवळपास ५० ते ६० फुट अंतरापर्यंत फरफटत नेले.

माजलगाव तालुक्यातील भाटवडगाव येथील काही लोक ॲटो (एम एच.२३ एन ०२७३) ने रविवारी अकरा ते साडेअकरा वाजेदरम्यान तेलगावकडून माजलगावकडे जात होता. ॲटो नित्रुड जवळील एका पेट्रोल पंपासमोर आली असता समोरून येणाऱ्या आयशर (एम.एच.२३ एम.९२५५) ने ॲटोला जोराची धडक दिली.

Beed Accident News
बीड : आजीच्या रक्षाविसर्जनासाठी जात असताना नातवाचा अपघाती मृत्यू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news