

राजू म्हस्के
कडा : बुधवारी दुपारच्या दरम्यान घरासमोरील शेतात काम करत असताना येथील एकाच कुटुंबातील चौघांनी येऊन जुन्या भांडणांची कुरापत काढून लाथाबुक्यांनी मारहाण करत, शिवीगाळ करून, जिवे मारण्याची धमकी दिली व बंद घराचा कडी, कोंडा तोडून आत घुसून संसारपयोगी वस्तुची नासधूस करत घर खर्चासाठी ठेवलेले रोख ३० हजार रूपये घेऊन गेल्याची घटना २ जुलै रोजी दुपारच्या दरम्यान घडली. या प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टी तालुक्यातील देवळाली (पानाची) येथील कल्पना मुकुंद वेदपाठक या दुपारच्या दरम्यान स्वत:च्या घरासमोरील शेतात काम करत असताना येथील चौघांनी त्याच्या घरी घेऊन जुन्या भांडणाची कुरापत काढून लाथा, बुक्यांनी मारहाण करत, कुटुंबाला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत घराचा कडी, कोंडा तोडून साहित्यांची नासधूस करत घर खर्चासाठी ठेवलेला ३० हजार रूपये घेऊन गेल्याची घटना देवळाली येथे घडली.
याप्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात कल्पना मुकुंद वेदपाठक याच्या फिर्यादीवरून संजय शंकर कटके, मंगल संजय कटके, विठ्ठल शंकर कटके, ओंकारेश्वर चांगदेव कटके यांच्यावर अंभोरा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस) ३०५(अ), ११५(२), ३५२, ३५१(२), ३२४(२), ३(५) नुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.