Beed Vilas Ghule killed case transferred|विलास घुले खून प्रकरण अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात वर्ग

Beed Vilas Ghule killed case transferred|विलास घुले खून प्रकरण अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात वर्ग
Vilas Ghule killed case
Vilas Ghule killed case Pudhari photo
Published on: 
Updated on: 

केज : विलास घुले खून प्रकरण हे आता अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील टाकळी तालुका केज येथील विलास घुले हे मित्र उमेश मानेला होत असलेल्या मारहाणी पासून बचावासाठी गेला होता. मानेचे एका विवाहित महिलेशी अनैतिक संबंध होते. हा राग मनात पकडून त्या महिलेचे नातेवाईक मानेला मारहाण करत होते. यावेळी घुले हे भांडण सोडवायला गेले. यावेळी घुलेंचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता.

याप्रकरणी मृत विलास घुलेंचा भाऊ रमेश घुले यांच्या तक्रारीवरून दहा आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास सीआयडीने करून दहा आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले आहे.

भाऊ रमेश घुले यांच्या तक्रारी वरून आरोपी विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ३९२/२०२६ भा. न्या. सं. १०३(१), १८९(२), १९१(२), १९३(३), १९०, ११८(१) प्रमाणे खुनासह इतर गुन्हे दाखल झाले होते.

त्यानंतर हा तपास सहाय्यक पोलिस अधीक्षक वेंकटराम यांच्या एसआयटी पथकाने करून यातील आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. त्या नंतर हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला होता.

Vilas Ghule killed case
Beed News : हाताला काम नाही, पोटाला घास नाही !

सीआयडी पथकाने तपास पूर्ण झाल्या नंतर दि. १५ सप्टेंबर रोजी रामेश्वर धर्मराज गायकवाड, बाबासाहेब गोरुबा उर्फ गोरख कदम, मंगेश गोरुबा उर्फ गोरख कदम, शुभम रामेश्वर गायकवाड, सुरज उर्फ भैय्यासाहेब उत्तरेश्वर गायकवाड, राजकुमार मोहन मोरे, बंकट उर्फ ​​अजय राम कदम, दीपक परसराम कदम, नवनाथ परसराम कदम आणि संतोष नरहरी कदम या दहा आरोपींच्या विरुद्ध केज न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे.

त्यावर दि. १६ सप्टेंबर रोजी न्यायालयात सुनावणी झाली. त्यावर पुढील सुनावणी २९ सप्टेंबर रोजी प्रथमवर्ग कनिष्ठ न्यायाधीश श्रीमती पी टी चव्हाण यांच्या समोर सुनावणी झाली. प्रथमवर्ग कनिष्ठ न्यायाधीश श्रीमती पी टी चव्हाण यांनी आता ही प्रकरण अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय केज येथे वर्ग करण्यात येत असल्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे आता विलास घुले खून प्रकरण हे आता केज येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात चालणार आहे.

Vilas Ghule killed case
Beed Crime News : हातात खडा ठेवला, रुद्राक्ष दाखवला अन् अंगठी लंपास

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news