Beed Crime News : हातात खडा ठेवला, रुद्राक्ष दाखवला अन् अंगठी लंपास

याप्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात तिघा अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Beed Crime News
Beed Crime News : हातात खडा ठेवला, रुद्राक्ष दाखवला अन् अंगठी लंपासfile photo
Published on: 
Updated on: 

A 68-year-old farmer was robbed of his ring by three unknown men

परळी, पुढारी वृत्तसेवा घराच्या बांधकामासाठी घेतलेले पैसे फेडल्यानंतर गहाण ठेवलेली सोन्याची अंगठी परत घेऊन घरी जात असलेल्या ६८ वर्षीय शेतकऱ्याची अनोळखी तिघांनी फसवणूक करून अंगठी लंपास केल्याची घटना परळीत घडली. याप्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात तिघा अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Beed Crime News
Beed News : शेतकरी कर्जमुक्ती; ३७ हजार ४५५ प्रकरणांची होणार पडताळणी

गणपत लक्ष्मण आंधळे (६८, रा. हेळंब, ता. परळी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी बांधकामासाठी परळीतील एका सराफा व्यापाऱ्याकडे १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी गहाण ठेवून १ लाख ९ हजार रुपये घेतले होते.

घेतलेली रक्कम परत केल्यानंतर ते अंगठी घेऊन घरी जाण्यासाठी निघाले होते. घरणीकर रोडचे बस स्टॅन्ड रस्त्यावरील बस स्थानकासमोरील ऑटो रिक्षा पॉईंट परिसरात एका अनोळखी व्यक्तीने त्यांना हटकले. त्यानंतर आणखी दोन व्यक्ती तेथे आल्या. तिघांनी त्यांना धार्मिक स्थळाचा पत्ता विचारत संभाषण सुरू केले.

Beed Crime News
Beed News : आजबेंनी जिभेला आवर घालावा : प्राजक्ता धस

याचवेळी एका व्यक्तीने हातातील खड्याबाबत बोलून वृद्धाला विशिष्ट पद्धतीने हात बंद करून चालण्यास सांगितले. त्यानंतर तिघांनी त्यांना सावलीच्या ठिकाणी नेले. एक रुद्राक्ष दाखवला. या तिघांनी त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी काढून रुमालात बांधण्यास सांगितले. त्यानंतर त्यांचे लक्ष दुसरीकडे वळवून अंगठी लंपास केली. काही वेळाने रुमाल तपासला असता त्यामध्ये अंगठी आढळली नाही. चोरी झालेल्या अंगठीची किंमत अंदाजे १ लाख ७ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news