Beed News : विजय पवार आ. संदीप क्षीरसागरांचा राईटहँड

डॉ. क्षीरसागर यांचा आरोप; जिल्ह्यात शैक्षणिक बंद : पोलिस अधीक्षकांना निवेदन
Beed News
Beed News : विजय पवार आ. संदीप क्षीरसागरांचा राईटहँडFile Photo
Published on
Updated on

Vijay Pawar is the right hand of Sandeep Kshirsagar, accused by Dr. Kshirsagar.

बीड, पुढारी वृत्तसेवा नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी शिक्षक विजय पवारला राजकीय पाठबळ असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांनी केला आहे. विजय पवार हा आमदार संदीप क्षीरसागरांचा राईटहॅन्ड असून, घटनेनंतर रात्री आमदारांच्या घरी जाऊन संबंधित यंत्रणांना फोन केले गेले.

Beed News
Wari 2025| पालखी मार्गावरील खुली मांस विक्री दुकाने बंद करण्याची भाविकांची मागणी

इतक्या गंभीर गुन्ह्यात आरोपी फरार राहतो, यामागे कोणाचा दबाव आहे का, याचा तपास झाला पाहिजे. शिक्षण क्षेत्रात पवार यांचा दबदबा असून, याआड अनेक आर्थिक गैरव्यवहार झाले असल्याचा आरोपही डॉ. क्षीरसागर यांनी केला, या प्रकरणाची सखोल चौकशी करून पीडितेला न्याय द्यावा. तसेच, सोमवारी बीड जिल्हा बंद पुकारण्यात आला असून सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

विजय पवार हा आमदार संदीप क्षीरसागर यांचा निकटवर्तीय आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो लोकप्रतिनिधीच्या घरी गेला आणि त्यानंतर फरार झाला, असे सांगत यंत्रणेवर दबाव टाकला गेला का, याची चौकशी करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. शिक्षण क्षेत्रात पवारचा दबदबा असून, याआड आर्थिक गैरव्यवहार, जमीन घोटाळे व क्लासेस चालक व विद्यार्थ्यांना त्रास देण्याचे प्रकार घडले आहेत.

Beed News
Beed News | आष्टी येथील टायगर ॲकडमीत भरतीपूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या चाळीस विद्यार्थ्यांना विषबाधा

या घटनेमुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, बीडमध्ये शनिवारी शैक्षणिक बंद पाळण्यात आला. सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या जिल्हा बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. क्षीरसागर यांनी केले. पीडित मुलगी मानसिकदृष्ट्‌या खचली असून, तिच्या कुटुंबीयांनी पुढे येऊन आवाज उठवावा, तसेच हा लढा सर्वांचा व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतः पुढाकार घेणार असल्याचे डॉ. योगेश क्षीरसागर यांनी सांगितले.

राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन

पोलीस अधीक्षकांकडून तसेच पीडितेच्या कुटुंबियांकडून माहिती घेतली असून, संपूर्ण प्रकरण पालकमंत्र्यांसमोर मांडले जाणार आहे. पवारचे सीडीआर तपासणे, सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेणे आणि आरोपीवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे डॉ. क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.

राजकारण बाजूला ठेवून आरोपीला वाचवण्याचा कोणताही प्रयत्न होऊ नये, यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. उमाकिरण समोर आंदोलन सलग दुसऱ्या दिवशी उमाकिरण शैक्षणिक संकुलासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी घोषणाबाजी करत विजय पवार व प्रशांत खाटोकर यांच्या प्रतिमेला काळे फासण्यात आले. तसेच आरोपींच्या अटकेसाठी पोलिस अधिक्षक यांना निवेदन देण्यात आले.

आरोपींना तत्काळ अटक करा: अशोक लोढा

बीड : शहरातील खाजगी क्लासेसचे संचालक विजय पवार व प्रशांत खाटोकर यांनी शैक्षणिक क्षेत्राला काळीमा फासण्याचे काम केले असून अत्यंत घृणास्पद गुन्हा केलेला आहे. बालमनाचा विचार न करता त्यांचे भविष्य उध्वस्थेकडे नेऊ पाहणाऱ्या या वासनांध प्रवृत्तीच्या नराधमाना तात्काळ अटक करावी. तसेच या आरोपींची कॉल रेकॉर्डिंग आणि मोबाईल डाटा व त्यांना सहकार्य करणाऱ्यांचे मोबाईल जप्त करून तपासण्या करण्यात याव्यात. तसेच त्यांना मदत करनाऱ्याना सह आरोपी करण्यात यावे असे निवेदन पोलिस अधीक्षक, बीड यांना भाजपा बीड शहर च्या वतीने देण्यात आले. या वेळी बीड शहाराध्यक्ष अशोक लोढा, केशव बडे, सतीश कोटेचा, अमोल वडविले सह भाजपाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

दोषींवर तत्काळ कडक कारवाई करा : एसएफआय

बीडमधील उमाकिरण शैक्षणिक संकुलात विद्यार्थिनीसोबत लैंगिक छळ झाल्याची घटना समोर आली आहे. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया बीड जिल्हा कमिटी या घटनेचा तीव्र निषेध करते. या प्रकरणातील दोषींना कडक शिक्षा करण्याची मागणी एसएफआय करते. तसेच या घटनेच्या निषेधार्थ एसएफआय सोबत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरावे, असे आवाहन एसएफआय चे राज्याध्यक्ष रोहिदास जाधव, बीड जिल्हाध्यक्ष सत्यजित मस्के, जिल्हासचिव पवन चिचाने, राज्य सहसचिव लहू खारगे, जिल्हा उपाध्यक्ष अंकुश कोकाटे, जिल्हा सहसचिव सारंग भगत, आरती साठे, पायल कोळी, हमीद शेख, हर्षद डाके, प्रथमेश उफाडे, संकल्प साठे, आनंद सक्राते, रामेश्वर जाधव यांच्या वतीने करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news