Beed News | आष्टी येथील टायगर ॲकडमीत भरतीपूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या चाळीस विद्यार्थ्यांना विषबाधा

जेवणातून विषबाधा झाल्‍याचे समोर | ग्रामीण रुग्‍णालयात उपचार सुरु
Beed News
विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले.pudhari photo
Published on
Updated on

कडा :- येथील टायगर अकॅडमीमध्ये रात्रीच्या जेवणातून ४० तरूणांना विषबाधा झाली आहे. या अकॅडमीत आष्टी तालुक्यासह इतर शासकीय सेवेत जाण्यासाठी नवनिर्वाचित उमेदवार प्रशिक्षणासाठी ऍडमिशन घेत असतात. यामध्ये शुक्रवार रात्री जेवल्यानंतर मध्यरात्री दोन च्या सुमारास विद्यार्थ्यांना जुलाब व उलटी होऊ लागली हळू हळू सगळ्याच विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी आष्टीच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. यातील जवळपास २० विद्यार्थ्यांना आहिल्यानगर येथे पुढील उपचारासाठी पाठविले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी आष्टी शहरातील टायगर अकॅडमीमध्ये भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी जवळपास ४४ विद्यार्थी आहेत. त्यांनी नेहमी प्रमाणे विद्यार्थ्यांना शुक्रवार (दि.२८) रोजी रात्री ९ च्या सुमारास जेवण दिले. यामध्ये हुलग्याची भाजी, भाकरी, भात दिला. परंतु मध्यरात्री दीडच्या सुमारास काही विद्यार्थ्यांना जुलाब व उलटीचा त्रास होऊ लागला हळूहळू सर्वच विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यातील काहि विद्यार्थ्यांची गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी आहिल्यानगर येथे पाठविण्यात आले.

Beed News
Beed News : आष्टी तालुक्यातून १५ वेठबिगार मुलांची सुटका

विषबाधा झालेले उमेदवार

अभिजीत अंगद शेळके,विकास आप्पासाहेब धुमाळ, सायली बाळू मांडगे, शिवाजी भाऊसाहेब धनवडे, आकाश आप्पा बांगर, सनी मोहन डफाळ, सुभाष खंडू धोत्रे, गोकुळ नाथा धुमाळ, सुभाष सोमीनाथ धोत्रे, कृष्णा सुरेश पांडुळे, रोहन संजय शेळके, प्रणव सर्जेराव भोसले, ऋषिकेश रामदेव खाडे, गणेश संजय नरवडे, आकाश रावसाहेब डफळ, विकास साहेबा फुलमाळी, रोहित बजरंग जगताप, गौरी काकासाहेब पाटील, विद्या विजय बोराडे, नेहा अशोक बारखेड, रोहित धर्मराज धनवडे, करुणा संतोष खंडागळे, रोहित रामभाऊ रोडे, अशोक उत्तम शेळके, विमल सुदाम देशमुख, मनीषा सायकड, प्रज्वल काकडे, सुनिता महात्माजी वाहटुळे, अनिरुद्ध बापूराव मिसाळ, मंगल संभाजी भोंगाळे, करण महादेव शेळके, राम प्रकाश शिंदे, दीक्षा गोरख गजघाट, हर्षद बबन कदम, देवकाते मयूर भीमसेन, कुदनाने किरण भाऊसाहेब, राहुल कैलास साबळे, आसिफ इनुस शेख, सुरज महादेव डोके, अशोक गवाजी रूपकर, आयान पठाण यांना झाली आहे.

सर्व प्रशिक्षणार्थींची प्रकृती स्थिर आहे.नेमकी विषबाधा का झाली याची चौकशी करू,ज्या विद्यार्थ्यांनची प्रकृती गंभीर आहे ते त्यांना पुढील उपचारासाठी आहिल्यानगर येथे पाठविले आहे.सर्व विद्यार्थ्यांनां वेळेत उपचार मिळाल्याने काळजी करण्याचे कोणतेच कारण नाही.

वैशाली पाटील, तहसिलदार आष्टी

मला काही माहिती नाही सीएस ला विचारा-डॉ.पवार

याबाबत आष्टी ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक पवार यांना एवढी मोठी विषबाधेची घटना घडल्याने पत्रकारांनी माहिती विचारण्यासाठी फोन केला असता मी आठ दिवसांपूर्वीच वैद्यकीय अधिक्षक पदाचा राजीनामा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे पाठविला आहे. तुम्ही सीएसला विचारा असे सांगितले व मला याबाबत काहीच माहिती नाही उलट तुमचा फोन उचलत असल्याचे सांगितले.

Beed News
वर्धा : 'बीआयटी' कॉलेजच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विषबाधा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news