Beed gambling raid : पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; आठ जुगाऱ्यांना पकडले, एकजण पळाला

१ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

केज : केज तालुक्यातील उमरी येथे पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ छापा टाकून आठ जुगाऱ्यांना ताब्यात घेत १ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी आठ जुगाऱ्यांना पकडले असून एकजण पळून गेला.

केज पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांना उमरी, ता. केज गावातील ओमकार किराणा दुकानाच्या पत्र्याच्या शेडमध्ये जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहिती मिळताच १० ऑगस्ट रोजी दुपारी ३:४० वाजण्याच्या सुमारास पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या आदेशा वरून सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण उंबरे, पोलिस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार यांच्यासह पोलिस हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे, पोलिस अंमलदार नितीन वारे, दादाराव देवगुडे व शिवाजी कागदे पोलिस पथकाने दुपारी सुमारे ३.४० वाजता जुगार अड्ड्यावर अचानक छापा टाकला.

Crime News
Hingoli Crime : शहर पोलिसांकडून ८ किलो गांजा जप्‍त

त्यावेळी अंकुश माणिक जाधव, अविनाश गंगाराम मुळे, प्रदीप दिलीप पवार, गानोबा गोकुळ भैरट, राजाभाऊ संपत मुळे, नवनाथ तुळशीराम शिंपले (सर्व रा. उमरी, ता. केज), बादल विठ्ठल पवार (रा. शामनगर, लातूर) आणि दिनू अभिमान कसबे (रा. उमरी, ता. केज) हे आठ जण जुगार खेळताना मिळून आले.

दरम्यान, पोलिस पथकाची चाहूल लागताच राजाभाऊ अंगद भैरट (रा. उमरी) हा आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. छाप्यात पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल फोन आणि मोटारसायकली असा एकूण १ लाख २८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Crime News
Jalna chilli market : काट्यावर मिरची; व्यापाऱ्यांकडून दरात कात्री

याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात गु.र.नं. ५१०/२०२६, कलम १२(अ), महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक तुकाराम मुरकुटे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news