Beed Drowning | तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा होडी पलटल्याने बुडून मृत्यू; एक मुलगी बचावली

धारूर तालुक्यातील हिंगणी तलावातील घटना
Dharur Hingni lake boat accident
Dharur Hingni lake boat accident Pudhari
Published on
Updated on

Dharur Hingni lake boat accident

धारूर : मत्स्य व्यवसाय करणाऱ्या परिवारातील 5 मुली धारूर तालुक्यातील हिंगणी तलावात शनिवारी (दि.१६) सकाळी साडेदहाच्या दरम्यान पोहण्यास गेल्या होत्या. तिथे मासे पकडण्यासाठी बनवलेल्या होडीवर तिघीजणी बसल्या असता दोघींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर एक जण आश्चर्यकारक रित्या बचावली. दरम्यान या घटनेने हिंगणी गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हिंगणी येथील पारवे कुटुंबातील पलक शामराव पारवे, दिव्या विकास कांबळे, मोहिनी भीमराव पारवे, तन्वी कोंडीराम पारवे, जानवी कोंडीराम पारवे यामुली हिंगणीचा तलावावर शनिवारी सकाळी पोहण्यास गेल्या होत्या, तिथे उपलब्ध असलेल्या मासे पकडण्याच्या होडीवर पलक, दिव्या व मोहिनी या तिघीजण बसल्या.

Dharur Hingni lake boat accident
Beed Agriculture News : बियाण्यांची कृत्रिम टंचाई केल्यास कारवाई करणार

तलावात आत गेल्यावर अचानक होडी पलटल्याने तिघीही पाण्यात बुडाल्या. यात मोहिनीला पोहता येत होते. पलक व दिव्या या दोघींनी तिला पकडल्याने तीही पाण्यात बुडाली. तळ्याच्या काठावर असलेल्या मुलींनी आरडाओरडा केल्याने स्थानिकांनी घटनास्थळावर धाव घेत तिघींना बेशुद्ध अवस्थेत पाण्याबाहेर काढले.

यात मोहिनीला शुद्ध आली असून पलक शामराव पारवे (वय 14, रा.हिंगणी व दिव्या विकास कांबळे रा. कासारवाडी ता.परळी) यांना अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असता मृत्यू घोषित करण्यात आले. या घटनेनंतर हिंगणी गावात शोककळा पसरली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news