Beed Accident News : पालखी महामार्गावर ट्रक व ॲटोच्या अपघात, ३ ठार, २ गंभीर जखमी, मृतात पती-पत्नीचा समावेश

मेहकर-पंढरपूर या पालखी महामार्गावरील तेलगाव-माजलगाव रस्त्यावर रविवारी रात्री भीषण अपघात झाला.
Beed Accident News
Beed Accident News : पालखी महामार्गावर ट्रक व ॲटोच्या अपघात, ३ ठार, २ गंभीर जखमी, मृतात पती-पत्नीचा समावेशFile Photo
Published on
Updated on

Truck and auto accident on Palkhi Highway, 3 dead, 2 seriously injured, husband and wife among the dead

माजलगाव : पुढारी वृत्तसेवा

मेहकर-पंढरपूर या पालखी महामार्गावरील तेलगाव-माजलगाव रस्त्यावर रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. त्यात तीनजण जागीच ठार तर दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

Beed Accident News
Monsoon News : राज्यात सुमारे १२ दिवस आधी दाखल झालेल्या मान्सूनचा प्रवास रखडला, शेतकरी चिंतेत

अपघातातील जखमींना माजलगाव येथील संजीवणी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ पाठविण्यात आले. मृतांमध्ये पतीपत्नीचा समावेश आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, आयशरने ॲटोला जवळपास ५० ते ६० फुट अंतरापर्यंत फरफटत नेले. घटनास्थळी दिंद्रुड पोलीस तात्काळ दाखल झाले.

या संदर्भात समजलेली माहिती अशी की, माजलगाव तालुक्यातील भाटवडगाव येथील कांही लोक ॲटो क्र.एम एच.२३ एन ०२७३ ने रविवारी अकरा ते साडेअकरा वाजेदरम्यान तेलगावकडुन माजलगावकडे जात होता. सदरील ॲटो नित्रुड जवळील एका पेट्रोल पंपासमोर आला असता समोरून येणाऱ्या आयशर क्र.एम.एच.२३ एम.९२५५ ने ॲटोला जबरदस्त धडक दिली.

आयशरने धडक देताच ॲटो जवळपास ५० ते ६० फुट दुर अंतरापर्यंत फरफटत नेले. या भीषण अपघातात ॲटोमधील तीन जण जागीच ठार झाले असुन, मृतात एका महिलेचा समावेश आहे. तर दोन गंभीर जखमी झाले असुन, सर्व जखमी गंभीर आहेत. त्यांना तेलगाव येथील रूग्ण वाहिकेने माजलगाव येथील रूग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले.

यात फारूक चांद सय्यद, त्यांच्या पत्नी सय्यद शबाना फारूक व शेख नोहिद एजाज हे तीन जण ठार झाल्याचे समजते. मृताच्या जवळ असलेल्या आधारकार्डवरून त्यांची ओळख झाली. अपघातातील जखमी फरीदा अन्वर पठाण व एक २२ वर्षाचा मुलगा नाव समजले नाही. दरम्‍यान आयशर चालक घटनास्थळावरून पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच दिंद्रुड पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव ढाकणे यांच्यासह पोलीस कर्मचारी महेश साळुंखे, खलील मोमीन, सचिन गायकवाड, कानदास बनसोडे, चामनर आदि तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

या अपघातातील जखमी २२ वर्षाचा मुलगा माजलगाव येथील संजीवनी या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news