

Tractor driver laborer beaten up by Guttedar
केज : गौतम बचुटे
केज येथे एका वीज वितरण कंपनीचे कामे करीत असलेल्या एका गुत्तेदाराने आणि त्याच्या गुंडाने त्यांच्याकडे काम करीत असलेल्या एका ट्रॅक्टर चालक मजुराला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. मारहाणीचे ईसमाची पाठ काळी-निळी झाली आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील सावळेश्वर येथील गोविंद दौंड हा केज येथील वीज वितरण कंपनीचे गुत्तेदार यांच्याकडे खांब उभे करण्याच्या ट्रॅक्टरवर काम करीत आहे. दि.३ मे रोजी गुत्तेदाराने त्याला शिवीगाळ केल्याने तो त्याला शिव्या का देता ? असे म्हणाला आणि त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचा राग मनात ठेवून धारूर रोड केज येथे गोविंद दौंड हा आला असता सदर गुत्तेदार आणि त्याचे पाच ते सहा गावगुंड यांनी गोविंद दौंड याला एकट्याला गाठून संगनमत करून लोखंडी रॉड आणि काठ्या व लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
या मारहाणीचे फोटो व्हायरल झाले आहेत. दरम्यान या बेदम मारहाण प्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नसून लवकर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती गोविंद दौंड यांनी दिली आहे.
दरम्यान गेवराईमध्ये एका रात्री आठ ते १० शेतकऱ्यांची घरे फोडल्याची घटना घडली होती. ही घटना रविवारी (दि.४) सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला असून या घटनेमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. बीड जिल्ह्यात सध्या दिवसेंदिवस चो-यांचे प्रमाण वाढत चालले आहे. तीन दिवसापूर्वीच गेवराईतील गायकवाड जळगावात चोरी होऊन लाखो रुपयांचा ऐवज आज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी मध्यरात्री मनुबाई जवळा येथील पोलिस कर्मचाऱ्याच्या घरासह आठ ते दहा शेतक-यांची अज्ञात चोरट्यांनी बंद घरे फोडली होती.
मनुबाई जवळा येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सतिश खरात यांचे घर फोडून घरातील डबे, पेटीतील कागदपत्र अस्ताव्यस्त केले मात्र, येथे चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. बीड जिल्ह्यात गुन्हेगारीला उत आल्याचे दिसत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी कडक पाउले उचलावीत अशी मागणी सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.