केज तालुक्यात दोन वेगवेगळ्या अपघातात तिघे ठार

अंबाजोगाई - कळंब, केज - धारूर रस्त्यावरील घटना
Beed Accident News
अपघातात चक्काचूर झालेली चारचाकीPudhari Photo
Published on
Updated on

गौतम बचुटे/केज : अंबाजोगाई - कळंब रस्त्यावरील डिघोळअंबा शिवारात दुचाकी व पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार पैठण (ता. केज) येथील दोन ठार झाल्याची घटना घडली. तर दुसऱ्या घटनेत केज - धारूर रस्त्यावरील तांबवा शिवारात उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला जीप धडकल्याने जीपमध्ये बसलेले नागझरी (ता. केज) येथील ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

Beed Accident News
Accident News : इंदापूर तालुक्यातील पाच जणांचा कार-टेम्पोच्या अपघातात मृत्यू

केज तालुक्यातील पैठण (सावळेश्वर) समीर महबूब शेख (वय २३) व रोहित हनुमंत सरवदे (वय २४) हे मजुरी करणारे तरुण ५ ऑक्टोबर रोजी सकाळी कामानिमित्त अंबाजोगाईला गेले होते. काम आटपून दुपारी ३ वाजेच्या सुमारास परत गावाकडे अंबाजोगाई - कळंब रस्त्याने येत होते. डिघोळअंबा - बोरीसावरगाव दरम्यान भरधाव वेगाने समोरून आलेल्या पिकअपने (एम. एच. १७ बी. वाय. ८६४४) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार हुसेन शेख हा तरुण जागीच ठार झाला. तर गंभीर जखमी झालेल्या रोहित सरवदे या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात मृतदेहांचे शवविच्छेदन झाल्यानंतर रविवारी दुपारी १ वाजेच्या नंतर दोघांच्या पार्थिवावर आपाआपल्या धर्मानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. या अपघात प्रकरणी युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता.

Beed Accident News
हिवरा फाट्यावर दुचाकीच्या अपघातात एकजण ठार

दुसऱ्या घटनेत नागझरी येथील ट्रक चालक संदीपान बापूराव चौरे ( वय ४२) हे शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास जीपमध्ये (एम. एच. ४४ बी. ३२१४ ) केजहून गावाकडे येत होते. त्यांची जीप ही केज - धारूर रस्त्यावरील तांबवा शिवारातील एका मंगल कार्यालयासमोर आली असता रस्त्याच्या कडेला उभे केलेले ट्रॅक्टर हे अंधारात दिसून न आल्याने जीपची उभ्या ट्रॅक्टरला जोराची धडक बसल्याने जीप चालकाच्या शेजारी बसलेले संदीपान चौरे यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर रविवारी दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या घटनेप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news